Join us  

४९ चेंडूंत कुटल्या २०२ धावा! भारतीय फलंदाज 404 Not Out; मोडला युवराज सिंगचा मोठा विक्रम

Karnataka's Prakhar Chaturvedi भारतीय क्रिकेटमध्ये प्रतिभावान खेळाडूंची कमी अजिबात नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 3:15 PM

Open in App

Karnataka's Prakhar Chaturvedi slams 404 not out - भारतीय क्रिकेटमध्ये प्रतिभावान खेळाडूंची कमी अजिबात नाही... आजच्या घडीला टीम इंडियाचे ३ वेगवेगळे संघ एकाच वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतील, असे तगडे खेळाडू BCCI कडे आहे. त्यात युवा संघातही चांगली स्पर्धा पाहायला मिळत आहे. कर्नाटकच्या प्रखर चतुर्वदीने कूच बिहार ट्रॉफीच्या फायनलमध्ये ( १९ वर्षांखालील) नाबाद ४०४ धावांची खेळी करून इतिहास रचला. मुंबईच्या गोलंदाजांची निर्दयीपणे धुलाई करताना प्रखरने इतिहास रचला. कूच बिहार स्पर्धेच्या फायनलमध्ये ४०० धावा करणारा तो पहिला फलंदाज बनला आहे. 

मुंबईचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. आयुष म्हात्रे व आयुष वर्तक यांच्या फटकेबाजी जोरावर मुंबईने ३८० धावांपर्यंत मजल मारली. म्हात्रेने १८० चेंडूंत १७ चौकार व ३ षटकारांसह १४५ धावा केल्या, तर वर्तकनेही ९८ चेंडूंत ७३ धावांचे योगदान दिले. त्यानंतर प्रतिक यादवच्या ३० धावांनी हातभार लावला. कर्नाटकच्या हार्दिक राजने सर्वाधिक ४ बळी टिपले. सर्मथ एन व राहुल द्रविडचा मुलगा समित यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

कर्नाटकने यानंतर धावांचा पाऊस पाडला. सलामीवीर प्रखर व कार्तिक यांनी १०९ धावांची सलामी दिली. कार्तिक ६७ चेंडूंत ५० धावांवर बाद झाला. त्यानंतर प्रखर व हर्षिल धर्मानी यांनी चांगली फटकेबाजी केली. दोघांनी २९० धावांची भागीदारी केली. हर्षिल २२८ चेंडूंत १६९ धावांवर बाद झाला. कार्तिकेय ( ७२) व समित ( २२) व हार्दिक राज ( ५१) यांनी चांगला खेळ केला. एका बाजूने प्रखरने फटकेबाजी सुरू करून ६३८ चेंडूंत नाबाद ४०४ धावा केल्या. त्यात त्याने ४६ चौकार व ३ षटकारांनी २०२ धावा कुटल्या. कर्नाटकने ८ बाद ८९० धावांवर डाव घोषित केला. 

प्रखरने आज युवराज सिंग याने २४ वर्षांपूर्वी या स्पर्धेच्या फायनलमध्ये केलेला ३५८ धावांचा विक्रम मोडला. या स्पर्धेतील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीत प्रखरची खेळी दुसऱ्या क्रमांकावर येते. महाराष्ट्राच्या विजय झोलने २०११-१२ मध्ये आसामविरुद्ध ४५१ धावा चोपल्या होत्या.  

टॅग्स :कूच बिहारकर्नाटकमुंबई