करुण नायरनं मोडला ऋतुराज गायकवाडचा विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय कॅप्टन

देशांतर्गत क्रिकेटमध्ये कॅप्टन्सी करताना ७०० पेक्षा अधिक धावा करणारा पहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 23:34 IST2025-01-16T23:25:33+5:302025-01-16T23:34:05+5:30

whatsapp join usJoin us
Karun Nair Breaks Ruturaj Gaikwad Record For Highest Run Getter As Captain In Vijay Hazare Trophy | करुण नायरनं मोडला ऋतुराज गायकवाडचा विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय कॅप्टन

करुण नायरनं मोडला ऋतुराज गायकवाडचा विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय कॅप्टन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Karun Nair Breaks Ruturaj Gaikwad Record : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विदर्भ संघाचे नेतृत्व करताना करुण नायर याने आपल्या बॅटिंगमधील कर्तृत्वही दाखवून दिले. देशांतर्गत वनडे स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये महाराष्ट्र विरुद्धचा सामना जिंकत त्याने विदर्भाला फायनलमध्ये एन्ट्री मिळवून दिली. संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या करुण नायर याने सेमी फायनल लढतीत २०० च्या स्ट्राइक रेटनं धावा कुटत मोठा विक्रम आपल्या नावे केला. विशेष म्हणजे फिल्डवर असलेल्या ऋतुराज गायकवाडचा विक्रम मोडित काढण्याचा पराक्रम त्याने केला आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा कॅप्टन ठरला करुण नायर

विजय हजारे स्पर्धेत संघाचे नेतृत्व करताना एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करुण नायरनं आपल्या नावे केला आहे. त्याने ऋतुराज गायकवाडला मागे टाकत या विक्रमाला गवसणी घातली. यंदाच्या विजय हजारे स्पर्धेत करुण नायरनं विदर्भ संघाचे नेतृत्व करताना ७५२ धावा ठोकल्या आहेत. यात ५ शतकासह एका अर्धशतकाचा सामावेश आहे. एवढेच नाहीतर ७ सामन्यात तो फक्त एकदाच आउट झाला.  

ऋतुराजला मागे टाकत ठरला लिस्ट एमधील सर्वोत्तम कॅप्टन

भारतीय क्रिकेटमधील प्रमुख लिस्ट ए स्पर्धेत संघाचे नेतृत्व करताना एका हंगामात ७०० पेक्षा अधिक धावा करणारा करुण नायर हा पहिला कॅप्टनही ठरला आहे. ऋतुराज गायकवाड याने २०२२-२३ च्या हंगामात ६६० धावा केल्या होत्या. गायकवाडनं  पाच डावात २०२० च्या सरासरीसह या धावा केल्या होत्याय. ज्यात ४ शतकांचा सावेश होता.


विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत एका हंगामात कॅप्टन्सीत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

  • करुण नायर- ७५२ (विदर्भ)
  • ऋतुराज गायकवाड- ६६० (महाराष्ट्र)
  • मयंक अग्रवाल- ६१९ (कर्नाटक)

Web Title: Karun Nair Breaks Ruturaj Gaikwad Record For Highest Run Getter As Captain In Vijay Hazare Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.