'नायर ऑलवेज फायर'! अखेरच्या षटकात केली चौकार-षटकारांची 'बरसात' (VIDEO)

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टॉपला आहे करुण नायर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 18:01 IST2025-01-16T18:00:16+5:302025-01-16T18:01:04+5:30

whatsapp join usJoin us
Karun Nair finished the innings off in style with 24 runs off the final over 88 off 44 balls as Vidarbha posted 380 Vijay Hazare Trophy SF vs Maharashtra | 'नायर ऑलवेज फायर'! अखेरच्या षटकात केली चौकार-षटकारांची 'बरसात' (VIDEO)

'नायर ऑलवेज फायर'! अखेरच्या षटकात केली चौकार-षटकारांची 'बरसात' (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Vidarbha Captain Karun Nair Another Fifty Plus Knock Vijay Hazare SF vs Maharashtra  : विदर्भ क्रिकेट संघाचा कर्णधार करुण नायर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील हिट शो सेमी फायनलमध्येही कामय राहिल्याचे पाहायला मिळाले. ऋतुराज गायगवाडच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघाविरुद्ध करुण नायरनच्या भात्यातून आणखी एक अर्धशतक पाहायला मिळाले. बडोदाच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात त्याने यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील हंगामातील आणखी एक क्लास अन् नॉट आउट इनिंग खेळली. सेमी फायनल लढतीत त्याने  ४४ चेंडूत ८८ धावांची दमदार खेळी केली. या नाबाद खेळीच्या जोरावर विदर्भ संघानं निर्धारित ५० षटकात ३ बाद ३८० धावा करत महाराष्ट्र संघासमोर धावांचा मोठा डोंगर उभारला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अखेरच्या ओव्हरमध्ये कुटल्या २४ धावा

विदर्भ संघाच्या डावातील अखेरच्या षटकात कर्णधार करुण नायर याने आक्रमक अंदाजात बॅटिंग करत महाराष्ट्र संघाच्या ताफ्यातील रजनीस गुर्बानी याची धुलाई केली. अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार मारत त्याने आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव गेला. पण त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर नायरनं उत्तुंग षटकार मारला. चौथ्या अन् पाचव्या चेंडूवर खणखणीत चौकार मारल्यावर सिक्सर मारत नायरनं संघाची धावसंख्या ३८० धावांवर पोहचवली.

सात डावात कुटल्या ७५२ धावा; फक्त एकदाच झाला 'आउट'

विजय हजारे ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या देशांतर्गत वनडे स्पर्धेत करुण नायर याने कमालीची कामगिरी करुन दाखवलीये. ७ सामन्यात ५ शतकं आणि एका अर्धशतकाच्या मदतीने त्याने ७५२ च्या सरासरीनं धावा काढत विक्रमी कामगिरी नोंदवली आहे.  या सात डावात फक्त तो एकदा बाद झाला आहे. या सामन्यातही त्याने १०१ चेंडूत ११२ धावांची खेळी केली होती. 

करुण नायरची यंदाच्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरी

  • १२२ (१०८)* विरुद्ध जम्मू काश्मिर
  • ४४ (५२)* विरुद्ध छत्तीसगड
  • १६३ (१०७)* विरुद्ध चंदिगड
  • १११ (१०३)* विरुद्ध तामिळनाडू
  • ११२ (१०१) विरुद्ध उत्तर प्रदेश
  • १२२ (८२)* विरुद्ध राजस्थान
  • ८८ (४४)* विरुद्ध महाराष्ट्र 
     

Web Title: Karun Nair finished the innings off in style with 24 runs off the final over 88 off 44 balls as Vidarbha posted 380 Vijay Hazare Trophy SF vs Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.