Join us

ना कॅप्टन 'आउट' ना संघ! करुण नायरच्या नेतृत्वात विदर्भ संघाने थाटात गाठली फायनल

विदर्भ संघानं ६९ धावांनी विजय मिळवत फायनलचं तिकीट मिळवलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 22:16 IST

Open in App

Karun Nair led Vidarbha beat Maharashtra And Enter Vijay Hazare Trophy Final : करुण नायरच्या क्लास शोसह त्याच्या नेतृत्वाखालील विदर्भ संघानं दुसऱ्या सेमीफायनल जबरदस्त कामगिरी करत ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र संघाचा विजय हजारे स्पर्धेतील प्रवास खल्लास केला. बडोदा येथील कोटांबी स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात विदर्भ संघानं ६९ धावांनी विजय मिळवत फायनलचं तिकीट मिळवलं. आता जेतेपदाच्या लढतीत त्यांच्यासमोर मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील कर्नाटक संघाचे आव्हान असेल.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ना कॅप्टन आउट ना संघ; विदर्भाची एकदम थाटात फायनलमध्ये एन्ट्री

बीसीसीआय अंतर्गत विजय हजारे ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या देशांतर्गत वनडे स्पर्धेत विदर्भाच्या संघाचा अन् या संघाचा कॅप्टन असलेल्या करुण नायर याची खास कामगिरी पाहायला मिळाली. एकही सामना न गमावता विदर्भाच्या संघाने दिमाखात फायनल गाठली. दुसरीकडे ७ सामन्यात ७५० हून अधिक धावा करणाऱ्या करुण नायर फक्त एकदाच बाद झाला. त्यामुळे सेमी फायनल लढतीत नाबाद खेळीसह परतण्याचा सीन पुन्हा क्रिएट केला. दुसरीकडे संघाने विजय सिलसिला कायम ठेवला.  

विदर्भाच्या ताफ्यातील चौघांनी दमदार बॅटिंगसह उभारली डोंगराऐवढी मोठी धावसंख्या

 महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय विदर्भ संघाच्या सलामी जोडीनं चुकीचा ठरवला. ध्रुव शौर्य ११४ (१२०) आणि यश राठोड ११६ (१०१) दोघांनी शतकी खेळीसह पहिल्या विकेटसाठी २२४ धावा करत महाराष्ट्र संघाच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. ही जोडी आपली भूमिका चोख बजावूनपरतल्यावर कर्णधार करुण नायरनं ४४ चेंडूत ८८ धावांची दमदार खेळी केली. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. त्याच्य्याशिवाय जितेश शर्मानं ३३ चेंडूत ५१ धावा केल्या. या चौघांच्या दमदार बॅटिंगच्या जोरावर विदर्भ संघानं निर्धारित ५० षटकात ३ बाद ३८० धावा करत महाराष्ट्र संघासमोर ३८१ धावांचे तगडे आव्हान ठेवले होते.

ऋतुराजचा फ्लॉप शो, अर्शिन कुलकर्णी लढला, पण शेवटी तो कमी पडला

या धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्र संघाचा कर्णधार अपयशी ठरला. अवघ्या ७ धावा करून त्याने मैदानात सोडले. सलामीवीर अर्शिन कुलकर्णी पन्हा एकदा लढला. पण त्याला अन्य कुणाची साथ मिळाली नाही. अर्शिन याने १०१ चेंडूत ९० धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय अंकित बावणेच्या ४९ चेंडूतील ५० धावा आणि निखील नाईकनं २६ चेंडूत केलेली ४६ धावांची खेळी करता अन्य कुणालाही लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. परिणामी महाराष्ट्र संघ निर्धारित ५० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात फक्त ३११ धावांपर्यंत मजल मारू शकला.

 

 

टॅग्स :विजय हजारे करंडकमयांक अग्रवालऋतुराज गायकवाडबीसीसीआय