गौतम गंभीर, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांच्यानंतर आता टीम इंडियाचा ओपनर शिखर धवन याने पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदी याला खडसावलं आहे. आफ्रिदीनं रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर त्याची चांगलीच खरडपट्टी केली. यावेळी आफ्रिदीनं काश्मीर मुद्दा उपस्थित करून लोकांना भडकावण्याचाही प्रयत्न केला. त्याच्या या विधानाचा गब्बर धवननं चांगलाच समाचार घेतला.
व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीला आफ्रिदीने कोरोना व्हायरसबाबत बोलत आहे पण त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काश्मीरबाबत बोलत आहे. या व्हिडीओ आफ्रिदी म्हणतो की, कोरोनापेक्षा मोठा रोग मोदी यांच्या मनात आणि डोक्यात आहे. तो आजार धर्माचा आहे. त्या आजारावर ते सत्ता चालवत आहेत. आमच्या काश्मिरी लोकांवर अत्याचार करत आहे याचे उत्तर त्यांना द्यावचं लागेल असं तो व्हिडीओत म्हणत आहे.''
आफ्रिदीच्या या विधानानंतर गौतम गंभीर, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी टीका केली. धवन म्हणाला,''सध्या संपूर्ण जग कोरोना व्हायरसशी मुकाबला करत आहे आणि तुम्हाला अजून काश्मीरची पडली आहे. काश्मीर आमचा होता आणि आमचाच राहणार. तुम्ही 20 करोड लोकं घेऊन या, आमचा एक लाखाच्या बरोबर आहे. आता तूच बेरीज करत बस.''