KBC मध्ये ४०,००० रुपयांसाठी विचारला T20 वर्ल्डकप Finalचा प्रश्न, तुम्हाला येतंय का उत्तर?

KBC Tv Show, ICC T20 World Cup 2024: टी२० वर्ल्डकप फायनलचा प्रत्येक क्षण भारतीय क्रिकेटरसिकांनी मनात साठवून ठेवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 04:59 PM2024-09-12T16:59:00+5:302024-09-12T17:00:22+5:30

whatsapp join usJoin us
Kaun Banega Crorepati Amitabh Bachchan asked question related to ICC T20 World Cup 2024 Final World Champion Team India for 40 thousand rupees | KBC मध्ये ४०,००० रुपयांसाठी विचारला T20 वर्ल्डकप Finalचा प्रश्न, तुम्हाला येतंय का उत्तर?

KBC मध्ये ४०,००० रुपयांसाठी विचारला T20 वर्ल्डकप Finalचा प्रश्न, तुम्हाला येतंय का उत्तर?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

KBC Tv Show, ICC T20 World Cup 2024: २९ जूनची रात्र, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी२० विश्वचषकातील फायनलचा सामना. हार्दिक पांड्याने शेवटचा चेंडू टाकला आणि तब्बल १४ वर्षांनंतर भारतीय संघाने टी२० विश्वचषक उंचावला. भारतीयांसाठी तो क्षण अतिशय स्पेशल होता. भारताच्या प्रत्येक क्रिकेटरसिकाला तो क्षण पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो. अनेकांनी तर फायनलचा सामनादेखील इतक्यांदा पाहिला असेल की कुठल्या चेंडूवर काय घडले, हे देखील त्यांच्या लक्षात राहिल. याच ऐतिहासिक क्रिकेट वर्ल्डकप बाबत महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या कौन बनेगा करोडपती या गेम शो मध्ये प्रश्न विचारण्यात आला.

अमिताभ यांनी विचारलेला प्रश्न-

  • ICC T20 World Cup 2024 च्या भारतीय संघात पुढीलपैकी कोणत्या खेळाडूचा समावेश नव्हता?


A) कुलदीप यादव
B) रविंद्र जाडेजा
C) रवीचंद्रन अश्विन
D) सूर्यकुमार यादव

हा प्रश्न स्पर्धकाला ४०,००० रूपयांच्या टप्प्यावर विचारण्यात आला होता. स्पर्धक क्रिकेटचा चाहता असल्याने त्यानेही योग्य उत्तर देत खेळ पुढे नेला. या प्रश्नाच योग्य उत्तर होते रवीचंद्रन अश्विन. अश्विन हा भारतीय संघातील एक अनुभवी गोलंदाज असला तरीही अमेरिका आणि कॅरेबियन बेटांवर झालेल्या स्पर्धेत अश्विनला संघात स्थान देण्यात आले नव्हते.

Web Title: Kaun Banega Crorepati Amitabh Bachchan asked question related to ICC T20 World Cup 2024 Final World Champion Team India for 40 thousand rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.