KBC Tv Show, ICC T20 World Cup 2024: २९ जूनची रात्र, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी२० विश्वचषकातील फायनलचा सामना. हार्दिक पांड्याने शेवटचा चेंडू टाकला आणि तब्बल १४ वर्षांनंतर भारतीय संघाने टी२० विश्वचषक उंचावला. भारतीयांसाठी तो क्षण अतिशय स्पेशल होता. भारताच्या प्रत्येक क्रिकेटरसिकाला तो क्षण पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो. अनेकांनी तर फायनलचा सामनादेखील इतक्यांदा पाहिला असेल की कुठल्या चेंडूवर काय घडले, हे देखील त्यांच्या लक्षात राहिल. याच ऐतिहासिक क्रिकेट वर्ल्डकप बाबत महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या कौन बनेगा करोडपती या गेम शो मध्ये प्रश्न विचारण्यात आला.
अमिताभ यांनी विचारलेला प्रश्न-
- ICC T20 World Cup 2024 च्या भारतीय संघात पुढीलपैकी कोणत्या खेळाडूचा समावेश नव्हता?
A) कुलदीप यादवB) रविंद्र जाडेजाC) रवीचंद्रन अश्विनD) सूर्यकुमार यादव
हा प्रश्न स्पर्धकाला ४०,००० रूपयांच्या टप्प्यावर विचारण्यात आला होता. स्पर्धक क्रिकेटचा चाहता असल्याने त्यानेही योग्य उत्तर देत खेळ पुढे नेला. या प्रश्नाच योग्य उत्तर होते रवीचंद्रन अश्विन. अश्विन हा भारतीय संघातील एक अनुभवी गोलंदाज असला तरीही अमेरिका आणि कॅरेबियन बेटांवर झालेल्या स्पर्धेत अश्विनला संघात स्थान देण्यात आले नव्हते.