Join us  

Kavya Maran, IPL 2022 SRH vs LSG Live: Washington Sundar चं जोरदार अपील अन् काव्या मारनची 'अतिसुंदर' रिअँक्शन... वाचा नक्की काय घडलं

काव्या मारन बहुतेक वेळा SRHच्या सामन्यांसाठी लावते हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 8:38 PM

Open in App

IPL 2022 SRH vs LSG Live: सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्या गोलंदाजांनी पॉवर-प्ले मध्ये सार्थ ठरवला. पहिल्या सहा षटकांचा खेळ संपताना हैदराबादने लखनौ संघाचे तीन गडी माघारी पाठवले. सलामीवीर क्विंटन डी कॉकला वॉशिंग्टन सुंदरने डावाच्या दुसऱ्या षटकात बाद केलं. त्यानंतर पुढील षटकात त्याने एविन लुईसलाही माघारी धाडलं. त्यावेळी संघाची मालकीण व सीईओ काव्या मारन हिला प्रचंड आनंद झाला. त्याच आधीच्या षटकात लुईसला बाद देण्यास पंचांनी नकार दर्शवला होता. पण नंतर सुंदरनेच त्याला बाद केले. त्या दरम्यान काव्याच्या 'सुंदर' रिअँक्शनने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.

--

दरम्यान, आज हैदराबाद संघाने आज संघात बदल केलेला नाही. पण लखनौ संघाने मात्र मागचा सामना जिंकूनही मोठा डाव खेळला. गेल्या वर्षी हैदराबाद संघाचा हुकूमी एक्का मानल्या जाणाऱ्या जेसन होल्डरला त्यांनी संघात स्थान दिले. "आम्ही जेसनला लिलावात निवडले, कारण तो जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडू आहे. तो नवीन चेंडू स्विंग करू शकतो आणि प्रतिस्पर्धी संघातील तळाचे फलंदाजही झटपट बाद करू शकतो. तसेच, मधल्या फळीत त्याने चांगली कामगिरी केली आहे", असं टॉसच्या वेळी राहुल म्हणाला.

लखनौ सुपर जायंट्स संघ - लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (किपर), मनीष पांडे, एविन लुईस, दीपक हुडा, आयुष बडोनी, कृणाल पांड्या, जेसन होल्डर, अँड्र्यू टाय, रवी बिश्नोई, आवेश खान

सनरायझर्स हैदराबाद संघ - केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (किपर), एडन मार्करम, अब्दुल समद, रोमॅरियो शेफर्ड, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक

 

टॅग्स :आयपीएल २०२२सनरायझर्स हैदराबादलखनौ सुपर जायंट्सवॉशिंग्टन सुंदर
Open in App