Video : SRH च्या पराभवानंतर दुःखी झालेली काव्या मारन ड्रेसिंग रूममध्ये पोहोचली अन्... 

सनरायझर्स हैदराबादला इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 05:52 PM2024-05-27T17:52:53+5:302024-05-27T17:53:17+5:30

whatsapp join usJoin us
Kavya Maran thinking and appreciating SRH's players for the way they played and their efforts, Video | Video : SRH च्या पराभवानंतर दुःखी झालेली काव्या मारन ड्रेसिंग रूममध्ये पोहोचली अन्... 

Video : SRH च्या पराभवानंतर दुःखी झालेली काव्या मारन ड्रेसिंग रूममध्ये पोहोचली अन्... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सनरायझर्स हैदराबादला इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आयपीएलच्या या पर्वात सर्वाधिक २८७ धावांचा डोंगर, पॉवर प्लेमध्ये विक्रमी १२५ धावा करणाऱ्या हैदराबादला फायनलमध्ये ११३ धावा करता आल्या. कोलकाता नाईट रायडर्सने १०.३ षटकांत ८ विकेट्स राखून हे लक्ष्य पार केले आणि तिसऱ्यांदा जेतेपदाचा चषक उंचावला. २०१६ नंतर सनरायझर्स हैदराबाद जेतेपदाचा चषक उंचावेल असे सर्वांनाच वाटले होते, परंतु KKR ने सांघिक कामगिरीच्या जोरावर बाजी मारली. संपूर्ण स्पर्धेत प्रतिस्पर्धींना धडकी भरवणारा संघ हताशपणे हरताना पाहून मालकिण काव्या मारन ( Kaviya Maran) ढसाढसा रडली. ८व्या षटकात तिने मॅच पाहणेच सोडून दिले होते, परंतु काहीवेळानंतर ती पुन्हा स्टँडवर दिसली. संघाच्या पराभवामुळे तिला खूप दुःख झाले होते. स्वतःला सावरून ती नंतर संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये पोहोचली...


सनरायझर्सच्या ओपनर्सनी यंदाच्या पर्वात धुमाकूळ घातले. ट्रॅव्हिस हेड व अभिषेक शर्मा यांनी आक्रमक फटकेबाजी करून संघाच्या इथपर्यंतच्या प्रवासात दमदार खेळ केला. हेडला प्ले ऑफच्या तीन सामन्यांत अपयश आले, परंतु त्याने एकंदर १५ सामन्यांत १९१.६५च्या स्ट्राईक रेटने ५६७ धावा कुटल्या. त्यात १ शतक व ४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानंतर अभिषेकने ४८४, हेनरिच क्लासेनने ४७९, नितीश कुमार रेड्डीने ३०३, एडन मार्करम २२० व शाहबाज अहमदने २१५ धावा केल्या. अब्दुल समद ( १८२), राहुल त्रिपाठी ( १६५) व पॅट कमिन्स ( १३६) यांनीही योगदान दिले. टी नटराजन ( १९), पॅट कमिन्स ( १८) व भुवनेश्वर कुमार ( ११) यांनी गोलंदाजीत कमाल करून दाखवली. तरीही फायनलमध्ये संघ हरला.


या पराभवानंतर काव्या मारन म्हणाली, तुम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतली. मला तुमचा अभिमान आहे. ट्वेंटी-२० क्रिकेट कसं खेळायचं हे तुम्ही दाखवून दिलं आणि प्रत्येक जण आपलीच चर्चा करत होते, KKR ही... आपल्या वाट्याला अपयश आले नव्हते आणि आज तो दिवस उजाडला. पण, खरचं तुम्ही सर्वांनी चांगला खेळ केला. तुम्हा सर्वांचे आभार. मागच्या वर्षी आपण शेवटच्या क्रमांकावर होतो आणि यावर्षी आपण चाहत्यांच्या अपेक्षांवर खरं उतरलो. हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं. 

Web Title: Kavya Maran thinking and appreciating SRH's players for the way they played and their efforts, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.