Join us  

सनरायझर्स हैदराबादच्या पराभवानंतर काव्या मारनचा फोटो व्हायरल; सोशल मीडियावर पुन्हा रंगली चर्चा

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals: वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने हैदराबादच्या फलंदाजीला पहिल्याच षटकात हादरे देत सामन्याचा निकाल स्पष्ट केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 8:17 AM

Open in App

IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals: एकतर्फी झालेल्या सामन्यात जबरदस्त खेळ केलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने शानदार विजयी सलामी सलामी देताना सनरायझर्स हैदराबादचा ७२ धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर २० षटकांत ५ बाद २०३ धावा उभारलेल्या राजस्थान संघाने यानंतर हैदराबादला २० षटकांत ८ बाद १३१ धावांमध्ये रोखले.

वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने हैदराबादच्या फलंदाजीला पहिल्याच षटकात हादरे देत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. त्याने पहिल्याच षटकात अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी यांना बाद करून हैदाराबादवर प्रचंड दडपण आणले. यामुळे हैदराबादच्या फलंदाजांना पुनरागमन करता आले नाही. 

सातव्या क्रमांकावरील अब्दुल समद याने सर्वाधिक नाबाद ३२ धावांची खेळी केली. मयांक अग्रवाल आणि हॅरी ब्रूक यांनी तिसऱ्या गड्यासाठी ३४ धावांची भागीदारी केली खरी. मात्र, त्यांना अपेक्षित धावगती राखता आली नाही. लेग स्पिनर युझवेंद्र चहल याने ४ बळी घेत हैदराबादच्या फलंदाजीतील हवा काढली. राजस्थानकडून पराभव झाल्यानंतर हैदराबाद संघाची सीईओ काव्या मारन पुन्हा चर्चेत आली आहे. 

सनरायझर्स हैदराबाद संघाची सीईओ काव्या मारन हिची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. काव्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. तिचे फोटो पाहून नेटकरी घायाळ झाल्याचे पाहायला मिळतात. मात्र आता हैदराबादच्या पराभवानंतरच्या काही फोटोमध्ये काव्या मारन निराश दिसत आहे. काव्या मारनचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. 

दरम्यान, यशस्वी जैस्वाल, जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी आक्रमक अर्धशतक झळकावत राजस्थानच्या द्विशतकी धावसंख्येचा पाया रचला. जैस्वाल बटलर यांनी ३५ चेंडूंतच ८५ धावांची तुफानी भागीदारी करत हैद्राबादची गोलंदाजी फोडून काढली. जैस्वाल सॅमसन यांनी दुसऱ्या गड्यासाठी ४० चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. यानंतर राजस्थानने ठरावीक अंतराने बळी गमावले. मात्र, शिमरोन हेटमायरच्या आक्रमकतेमुळे राजस्थानने द्विशतकी मजल मारली. फझलहक फारुखी आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

टॅग्स :सनरायझर्स हैदराबादराजस्थान रॉयल्ससोशल व्हायरल
Open in App