Join us  

के.डी. जाधव स्मृती कुस्ती स्पर्धेची घोषणा

राष्ट्रकुल हेवीवेट कुस्तीचे माजी चॅम्पियन संग्राम सिंग यांनी शुक्रवारी पहिल्या के.डी. जाधव स्मृती आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेची घोषणा केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:56 AM

Open in App

नवी दिल्ली : राष्ट्रकुल हेवीवेट कुस्तीचे माजी चॅम्पियन संग्राम सिंग यांनी शुक्रवारी पहिल्या के.डी. जाधव स्मृती आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेची घोषणा केली. ही स्पर्धा १५ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे.संगाने पाच कार्ड तयार केले असून त्यात त्याने स्वत:ला अमेरिकेचा स्टार मल्ल केव्हिन रैडफोर्डविरुद्ध ठेवले आहे.पत्रकार परिषदेत बोलताना संग्राम म्हणाला, ‘आम्ही देशातील युवा व प्रतिभावान मल्लांना संधी प्रदान करणार आहोत. त्याचसोबत आम्ही आपल्या महान मल्लाच्या स्मृती कायम स्मरणात ठेवणार आहोत. आम्ही केवळ खेळाचा दर्जा सुधारण्यास प्रयत्नशील नसून टीयर-२ व टीयर-३ शहरांमधून अधिक प्रतिभावानांचा शोध घेण्यास प्रयत्नशील आहोत.’यावेळी भारताचा पहिला वैयक्तिक आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा, आॅलिम्पियन बॉक्सर अखिल कुमार व जितेंदर कुमार यांचीही उपस्थिती होती.बिंद्रा म्हणाला, ‘भारतीय खेळासाठी हा महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या देशाच्या पहिल्या वैयक्तिक आॅलिम्पिक पदक विजेत्याचा गौरव करण्याची यापेक्षा चांगली पद्धत असू शकत नाही. मी नेहमी के.डी. जाधव यांचा प्रशंसक राहिलो आहे. ’काही अंडर-कार्ड मल्ल युद्धिष्ठिर, लुभांशू, शेरपाल, हिमांशू, श्रवण आणि प्रतीक यावेळी उपस्थित होते. दोन महिला मल्ल एकता विरुद्ध आकांक्षा यामध्ये दिसतील.स्पर्धेचे आयोजन व्यावसायिक कुस्ती नियमानुसार होईल. त्यात सहा-सहा मिनिटांच्या सहा फेºया होतील. (वृत्तसंस्था)>कुस्ती स्पर्धेची घोषणा करताना (डावीकडून)मल्ल संग्राम सिंग, आॅलिम्पिक सुवर्ण पदक विजेता माजी नेमबाज अभिनव बिंद्रा आणि स्टार बॉक्सर अखिल कुमार एकत्रआले होते.