'मराठी'ला बळ देण्यासाठी झहीर खानसह मराठमोळा सिद्धू मैदानात; चाहत्यांना केलं खास आवाहन 

jiocinema commentators ipl 2023 : सध्या इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या हंगामाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 06:14 PM2023-04-09T18:14:22+5:302023-04-09T18:15:41+5:30

whatsapp join usJoin us
Kedar Jadhav, Siddesh Lad, actor Siddharth Jadhav, former India player Zaheer Khan and Dhaval Kulkarni are commentating in Marathi on Jio Cinemas in IPL 2023 | 'मराठी'ला बळ देण्यासाठी झहीर खानसह मराठमोळा सिद्धू मैदानात; चाहत्यांना केलं खास आवाहन 

'मराठी'ला बळ देण्यासाठी झहीर खानसह मराठमोळा सिद्धू मैदानात; चाहत्यांना केलं खास आवाहन 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

marathi commentary in ipl । मुंबई : सध्या इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या (IPL 2023) हंगामाचा थरार रंगला आहे. केदार जाधव एकेकाळी भारतीय संघाच्या मधल्या फळीचा नियमित सदस्य होता. मात्र, वेळ कधी कोणाला संधी देईल आणि कोणाला डच्चू देईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. असेच काहीसे केदार जाधव या मराठमोळ्या क्रिकेटपटूच्या बाबतीत झाले. केदार जाधवला भारतीय संघामधून अचानक वगळण्यात आले आणि आता त्याची आयपीएल कारकीर्द देखील जवळपास संपली आहे. कारण त्याला आयपीएलच्या मिनी लिलावामध्ये कोणत्याही फ्रॅंचायझीने खरेदी केले नाही. खरं तर हा मराठमोळा क्रिकेटपटू मागील 12 महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर राहिला आहे. मात्र, आता त्याने नवी इनिंग सुरू केली असून तो आयपीएलमध्ये मराठी भाषेत समालोचन करत आहे. 

केदार जाधवसह झहीर खान देखील मराठीत समालोचन करत असून त्याने मराठी चाहत्यांना एक खास आवाहन केले आहे. खरं तर यंदा जिओ सिनेमावर आयपीएलमध्ये एकूण 12 भाषांमध्ये समालोचन होत आहे. यामध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती, भोजपुरी, पंजाबी, ओरिया, बंगाली, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांचा समावेश आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ जाधवने "मी मराठी... तू मराठी... टाटा आयपीएल मराठी, बघताय ना मला, समालोचन करताना...", अशा शब्दांत मराठीतील समालोचन ऐकण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय भारताचा माजी गोलंदाज झहीर खान आणि धवल कुलकर्णी यांनी देखील खास आवाहन केले आहे. 

झहीर खानची मराठी चाहत्यांना साद 

मराठीतून समालोचन करणारे शिलेदार -
केदार जाधव, धवल कुलकर्णी, किरण मोरे, सिद्धेश लाड, प्रसन्न संत, चैतन्य संत, कुणाल दाते, विकत पाटील, पूर्वी भावे, झहीर खान.  

"मी मराठी... तू मराठी...", सिद्धूची खास पोस्ट 


 
"आपली भाषा, आपलीच माणसं" 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Kedar Jadhav, Siddesh Lad, actor Siddharth Jadhav, former India player Zaheer Khan and Dhaval Kulkarni are commentating in Marathi on Jio Cinemas in IPL 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.