Join us  

CPL 2020 : किप डिस्टन्स!; कोरोना व्हायरसमुळे विकेट सेलिब्रेशनची स्टाईलच बदलली, पाहा हा व्हिडीओ

CPL 2020 : हेटमारयरची तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 4:51 PM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी)  खेळाडूंची सुरक्षा लक्षात घेता काही नियम बदलले. त्यामुळे खेळाडूंनाही त्यांच्या सेलिब्रेशनची स्टाईल बदलावी लागली. तरीही इंग्लंड-वेस्ट इंडिज, इंग्लंड-आयर्लंड, इंग्लंड-पाकिस्तान या मालिकांमध्ये विकेट गेल्यानंतर खेळाडू एकमेकांना टाळी देताना किंवा मिठी मारताना दिसलेच. पण, कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL) किमो पॉलच्या 'किप डिस्टन्स' सेलिब्रेशननं सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स आणि गयाना अॅमेझॉन वॉरियर्स यांच्यात आज सामना झाला. वॉरियर्सनं 3 विकेट्स राखून हा सामना जिंकला. किमो पॉल आणि इम्रान ताहीर यांनी अनुक्रमे 4 व 2 विकेट्स घेऊन पॅट्रीओट्स संघाला 20 षटकांत 8 बाद 127 धावांपर्यंत रोखले. एव्हीन लूईस ( 30) आणि बेन डंक ( 29) यांनी पॅट्रीओट्सकडून संघर्ष केला. पॉलने चार षटकांत 19 धावांत 4 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर वॉरियर्सनं शिमरोन हेटमारच्या फटकेबाजीच्या जोरावर हा सामना जिंकला. हेटमारयनं 44 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकार खेचून 71 धावांची खेळी केली. वॉ़रियर्सनं 17 षटकांत 7 विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले. पण, किमो पॉलच्या सेलिब्रेशननं सर्वांचे लक्ष वेधले. 

पाहा व्हिडीओ...  

 

टॅग्स :कॅरेबियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेट