Join us  

युजवेंद्र चहलचं लग्न; रोहित शर्मानं दिला फिरकीपटूला सल्ला; ट्विट व्हायरल

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) आणि धनश्री वर्मा हे मंगळवारी  लग्न बंधनात अडकले. चहलनं सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: December 23, 2020 1:51 PM

Open in App

भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) आणि धनश्री वर्मा हे मंगळवारी  लग्न बंधनात अडकले. चहलनं सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. युझवेंद्र चहल आणि धनश्रीचा याच वर्षी ऑगस्ट महिन्यात साखरपुडा पार पडला होता. आयपीएल 2020 दरम्यान धनश्रीदेखील चहलबरोबर यूएईमध्ये उपस्थित होती. एवढेच नाही तर ती सामन्यांदरम्यान चहलच्या टीम रॉयल चॅलेन्जर्स बँगळुरूला सपोर्ट करताना दिसत होती. लग्नानंतर चहल व धनश्री यांना सर्वांच्या शुभेच्छा मिळत आहेत. त्यात हिटमॅन रोहित शर्मानं ( Rohit Sharma) युजवेंद्रला सल्ला दिला आहे.

चहल आणि धनश्री यांचे चाहते दोघांच्या लग्नानंतर अत्यंत आनंदी दिसत आहेत. तसेच त्यांच्या फोटोवर कमेंट देखील करत आहेत. धनश्री एक डॉक्टर, कोरियोग्राफर आणि यूट्यूबर आहे. धनश्री अनेक वेळा सोशल मीडियावर आपले डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर लाइक्स आणि कॉमेंट्स येत असतात. एवढेच नाही तर तिची स्वतःची डान्स कंपनीदेखील आहे. इंस्टाग्रामवरही धनश्रीचे पाच लाखांवर फॉलोअर्स आहेत.  चहल आणि रोहित यांच्यात सोशल मीडियावर नेहमी चेष्टामस्करी पाहायला मिळते. रोहित व त्याची पत्नी रितिका यांची चहल अनेकदा फिरकी घेतानाही दिसतो. पण, आता रोहितनं त्याची फिरकी घेतली. रोहितनं ट्विट केलं की,अभिनंदन भावा. तुम्हा दोघांना नव्या इनिंगसाठी शुभेच्छा... प्रतिस्पर्धींसाठी वापरणारी गुगली धनश्रीसाठी वापरू नकोस..

टॅग्स :युजवेंद्र चहलरोहित शर्मा