1949नंतर प्रथमच घडला असा विक्रम, 43 वर्षीय फलंदाजांनं झळकावलं द्विशतक

इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये मंगळवारी 43 वर्षीय डॅरेन स्टीव्हन्सने विक्रमी खेळी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 10:12 AM2019-09-17T10:12:47+5:302019-09-17T10:13:05+5:30

whatsapp join usJoin us
Kent’s Darren Stevens becomes oldest batsman to score double ton in first-class cricket since 1949 | 1949नंतर प्रथमच घडला असा विक्रम, 43 वर्षीय फलंदाजांनं झळकावलं द्विशतक

1949नंतर प्रथमच घडला असा विक्रम, 43 वर्षीय फलंदाजांनं झळकावलं द्विशतक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये मंगळवारी 43 वर्षीय डॅरेन स्टीव्हन्सने विक्रमी खेळी केली. केंट संघाचे प्रतिनिधित्व करतान डॅरेनने 237 धावांची खेळी करताना यॉर्कशायर संघाचे धाबे दणाणून सोडले. 1949नंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो पहिलाय वयस्कर खेळाडू ठरला आहे. 

यॉर्कशायरच्या ड्यून ऑलिव्हरने केंटच्या आघाडीच्या फलंदाजांना झटपट माघारी परतले. 5 बाद 39 धावा अशी केंटची अवस्था झाली होती, परंतु स्टीव्हन्स आणि सॅम बिलिंग या जोडीनं सहाव्या विकेटसाठी 346 धावांची भागीदारी केली. कौंटी क्रिकेटच्या यंदाच्या मोसमातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. स्टीव्हन्सने 225 चेंडूंत 28 चौकार व 9 षटकारांसह 237 धावा केल्या, तर बिलिंग्सने 209 चेंडूंत 16 चौकार व 1 षटकारासह 138 धावा केल्या.  



Web Title: Kent’s Darren Stevens becomes oldest batsman to score double ton in first-class cricket since 1949

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.