डॅरेन स्टीव्हन्सने दुसऱ्या डावात यॉर्कशायर संघाच्या पाच फलंदाजांना बाद करून कौंटी अजिंक्यपद स्पर्धेच्या डिव्हिजन A गटातील सामन्यात केंट संघाला 433 धावांनी विजय मिळवून दिला. केंटने विजयासाठी ठेवलेल्या विक्रमी 551 धावांचा पाठलाग करताना यॉर्कशायरचा संपूर्ण संघ 117 धावांत तंबूत परतला. यॉर्कशायरचे 6 फलंदाज अवघ्या 44 धावांत माघारी परतले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील केंट संघाचा हा सर्वात मोठा विजय, तर यॉर्कशायरचा लाजीरवाणा पराभव ठरला आहे. कौंटी क्रिकेटच्या इतिहासात धावांच्या बाबतित हा सर्वात मोठा विजय आहे.
पहिल्या डावात पाच विकेट्स अवघ्या 39 धावांत जाऊनही धावांच्या बाबतीत दुसरा मोठा विजय ठरला आहे. या विक्रमता महाराष्ट्र आघाडीवर आहे. 1944 साली झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावात निम्मा संघ 46 धावांत गमावला होता, परंतु त्यांनी कमबॅक करताना नवानगर पूना संघावर 489 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर केंटने ( 5/39, पहिला डाव) यॉर्कशायरवर मिळवलेला हा दुसरा मोठा विजय ठरला.
पहिल्या डावात 43 वर्षीय स्टीव्हन्सने विक्रमी खेळी केली. केंट संघाचे प्रतिनिधित्व करतान डॅरेनने 237 धावांची खेळी करताना यॉर्कशायर संघाचे धाबे दणाणून सोडले. 1949नंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो पहिलाय वयस्कर खेळाडू ठरला आहे. 5 बाद 39 धावा अशी केंटची अवस्था झाली होती, परंतु स्टीव्हन्स आणि सॅम बिलिंग या जोडीनं सहाव्या विकेटसाठी 346 धावांची भागीदारी केली. कौंटी क्रिकेटच्या यंदाच्या मोसमातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. स्टीव्हन्सने 225 चेंडूंत 28 चौकार व 9 षटकारांसह 237 धावा केल्या, तर बिलिंग्सने 209 चेंडूंत 16 चौकार व 1 षटकारासह 138 धावा केल्या. बिलिंग्सने दुसऱ्या डावातही शतकी खेळी केली.
केंट - 8 बाद 482 डाव घोषित ( डॅरेन स्टीव्हन्स 237, सॅम बिलिंग्स 138; ऑलिव्हर 5/108) आणि 7 बाद 337 डाव घोषित ( बिलिंग 122*, रॉबिन्सन 97) वि. वि. यॉर्कशायर 269 ( फिशर 47*; मिलनेस 5/87) आणि 117 ( स्टीव्हन्स 5/20), 433 धावांनी विजयी.
क्रिकेटच्या इतिहासात 124 वर्षांनंतर घडला असा पराक्रमया सामन्यात डॅरेन स्टीव्हन्सने ( 43 वर्षे व 132 दिवस) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात द्विशतक व पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. 124 वर्षानंतर अशी कामगिरी करणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. याआधी 1895साली डब्लूजी ग्रेस यांनी ( 46 वर्षे व 303 दिवस) यांनी अशी कामगिरी केली होती.