इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल ) स्पॉट फिक्सिंग प्रकरणात निलंबनाची कारवाई झालेला गोलंदाज एस श्रीसंत लवकरच क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहे. सात वर्षानंतर श्रीसंतचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत तो केरळच्या संघाकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्याला स्वतःची तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल. 2013च्या आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणात श्रीसंतवर सात वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये ती सात वर्ष पूर्ण होणार आहेत.
पाकिस्तानचा गोलंदाज हसन अली बनला 'स्ट्रीट डान्सर'; Video Viral
2013मध्ये दिल्ली पोलिसांनी मॅच फिक्सिंग प्रकरणात श्रीसंत आणि राजस्थान रॉयल्सच्या त्याच्या आणखी दोन सहकारी अजित चंडिला व अंकित चव्हाण यांना अटक केली होती. बीसीसीआयनं त्यानंतर या तीनही खेळाडूंवर बंदीची कारवाईकेली. 2015मध्ये श्रीसंतला विशेष न्यायायलानं त्याची निर्दोष म्हणून सुटका केली. 2018मध्ये केरळ न्यायालयानेही त्याच्यावरील आजीवन बंदी उठवली. आता सात वर्षांची बंदी पूर्ण झाल्यानंतर तो रणजी करंडक स्पर्धेत केरळ संघाकडून खेळणार आहे. रणजी संघाचे प्रशिक्षक टीनू जॉन यांच्याशी चर्चा करून श्रीसंतचा संघात समावेश करण्याचा निर्णय झाला आहे.
कोरोना व्हायरसच्या संकटात रणजी करंडक स्पर्धेच्या आयोजनाबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) अद्याप काही घोषणा केलेली नाही. पण, श्रीसंत हा केरळच्या रणजी संघाचा सदस्य असेल,असा निर्णय केरळ क्रिकेट संघटनेने घेतला आहे. एशियननेट न्यूजशी बोलताना श्रीसंतने सांगितले की,''मला संधी दिल्याबद्दल मी केरळ क्रिकेट संघटनेचा आभारी आहे. मी तंदुरुस्ती सिद्ध करेन. सर्व वादांना शांत करण्याची ही संधी आहे.''
श्रीसंतनं भारतासाठी 27 कसोटीत 87, तर वन डे सामन्यांत 75 विकेट्स घेतल्या आहेत. 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप संघाचा तो सदस्य होता.
कोरोना पॉझिटिव्ह शाहिद आफ्रिदीचा नवा व्हिडीओ व्हायरल; म्हणतो, 'त्या' सर्व अफवा!
निसर्ग वादळात उद्ध्वस्त झालेलं गाव पुन्हा उभं करण्यासाठी पृथ्वी शॉचा पुढाकार!
शहीद जवानाचे वडील म्हणाले, नातवंडांनाही लढायला पाठवणार... वीरूने केला 'बापमाणसा'ला सलाम
कोरोनाच्या संकटात मोठ्या क्रिकेट लीगची घोषणा; 8 संघांमध्ये रंगणार 46 सामन्यांचा थरार!