चिनी लोकांवर भडकला इंग्लंडचा क्रिकेटपटू; हासडली F#@#@G सणसणीत शिवी

डिसेंबर 2019मध्ये या व्हायरसचा पहिला रुग्ण सापडल्याचे बोलले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 03:25 PM2020-03-24T15:25:44+5:302020-03-24T15:26:46+5:30

whatsapp join usJoin us
Kevin Pietersen criticizes Wuhan's wet animal market for the spread of Coronavirus svg | चिनी लोकांवर भडकला इंग्लंडचा क्रिकेटपटू; हासडली F#@#@G सणसणीत शिवी

चिनी लोकांवर भडकला इंग्लंडचा क्रिकेटपटू; हासडली F#@#@G सणसणीत शिवी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

चिनच्या वुहान शहरातून आलेल्या कोरोना व्हायरनं आज संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे.वटवाघुळ खाल्ल्यामुळे हा व्हायरस माणसांच्या शरीरात गेला असं बोललं जात आहे. वुहान शहरात वटवाघुळप्रमाणे अनेक प्राण्यांना विक्रीसाठी ठेवले जाते. त्यांना खाण्यासाठी बाजारच भरतो. येथे माकड, कुत्रे, मांजरी, अजगर आणि काही दुर्मिळ प्रजातिचे प्राणीही खाल्ले जातात. चिनी लोकांच्या या खाद्यंसस्कृतीवर इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हीन पीटरसन चांगलाच भडकला आहे आणि त्यानं तर चिनी लोकांना शिवीगाळ केली आहे.
 

जगभरात आतापर्यंत कोरोना संक्रमितांचा आकडा हा 382,366 इतका झाला आहे. त्यापैकी बरे होणाऱ्यांची संख्या ही 102,505 इतकी आहे, पण 16,568 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. केपीनं तीव्र शब्दात चिनी लोकांवर आगपाखड केली. माजी क्रिकेटपटू आता प्राण्यांच्या संघटनांसोबत कामही करत आहे आणि त्यानं सोशल मीडियावरून आपली नाराजी प्रकट करताना भविष्यात कठोर पाऊलं उचलण्याची मागणी केली आहे.




केपीचे हिंदीतून ट्विट...
कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी संपूर्ण जग एकजुट झाला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  22 मार्चला जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होते. भारताच्या या एकजुटीचं पीटरसन यानं कौतुक केलं आणि तेही हिंदी भाषेत. तो म्हणाला,''नमस्ते इंडिया.कोरोना व्हायरसला हरवण्यासाठी आपण एकत्र यायला हवं. सर्वांना आपापल्या सरकारनं केलेल्या आव्हानाचं पालन करायला हवं. काही दिवसांसाठी घरीच राहा, आपली हुशारी दाखवण्याची हीच ती वेळ. तुम्हा सर्वांना खुपखुप प्रेम.'' पीटरसननं हे ट्विट हिंदीतून केलं.

केपीच्या या ट्विटला पंतप्रधानांनीही रिप्लाय दिला आणि म्हटलं की,''विस्फोटक फलंदाज आपल्याला काही सांगत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी आपणही एकत्र येऊया.'' पंतप्रधानांच्या या ट्विटवर केपीनं त्वरीत रिप्लाय दिला. त्यानं मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले. तो म्हणाला,''धन्यवाद मोदीजी, तुमचं नेतृत्वही विस्फोटक आहे.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirusमुळे श्रीमंत फुटबॉलपटूंना मोठा फटका; वाचून तुम्हाला बसेल धक्का...

इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा स्तुत्य उपक्रम; पबचे बनवले किराणा दुकान, वाचवला अनेकांचा रोजगार

IPL 2020 रद्द? फ्रँचायझी मालकाचे स्पष्ट संकेत; BCCI ला 2000 कोटींचे नुकसान

Video : जगातला अव्वल अष्टपैलू क्रिकेटर आयसोलेशनमध्ये; मुलीला पाहता येत नसल्यानं झाला भावुक

कोरोनाशी मुकाबला; भारताच्या कुस्तीपटूनं दिला सहा महिन्यांचा पगार  

Web Title: Kevin Pietersen criticizes Wuhan's wet animal market for the spread of Coronavirus svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.