TATA IPL 2022 Groups & Format : इंडियन प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक गुरुवारी पार पडली आणि त्याता टाटा आयपीएल २०२२ च्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आयपीएलचे १५ वे पर्व एकाच राज्यात खेळवण्यात येणार आहे. कोरोना संकट टाळण्यासाठी बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. मागच्या वेळेत बीसीसीआयला आयपीएल मध्यंतरातच स्थगित करावी लागली होती. त्यातून धडा घेत बीसीसीआयनं हवाई प्रवास टाळून एकाच राज्यात स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
- २६ मार्च, २०२२ ला ही लीग सुरू होणार असून २९ मे, २०२२ला अंतिम सामना खेळवण्यात येईल.
- मुंबई आणि पुणे येथील चार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियम्सवर साखळी फेरीचे ७० सामने खेळवण्यात येणार आहेत. प्ले ऑफच्या सामन्यांचा निर्णय नंतर घेतला जाईल.
कोणत्या स्टेडियम्सवर किती सामने?
- प्रत्येक संघ प्रत्येकी चार सामने वानखेडे स्टेडियम व डी वाय पाटील स्टेडियमवर खेळतील
- प्रत्येक संघ प्रत्येकी तीन सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे होतील
- १० संघ प्रत्येकी १४ सामने खेळतील ( ७ होम व ७ अवे ). साखळी फेरीत ७० सामने होतील आणि त्यानंतर प्ले ऑफचे चार सामने होतील. प्रत्येक संघ पाच संघांशी दोनवेळा आणि उर्वरित चार संघांशी एक वेळा खेळेल.
- आयपीएलमधील जेतेपदानुसार आणि कोणत्या संघाने कितीवेळा फायनलमध्ये प्रवेश केला यानुसार गट बनवण्यात आले आहेत. त्याची माहिती पुढील प्रमाणे
गटवारी
प्रत्येक संघ आपापल्या गटातील संघांशी प्रत्येकी दोनवेळा खेळतील आणि दुसऱ्या गटातील एकाच रांगेत असलेल्या संघाशीही दोन सामने होतील, तर उर्वरित संघांशी प्रत्येकी एकवेळा खेळतील.
उदा. ग्रुप ए मध्ये मुंबई इंडियन्सन कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स व लखनौ सुपर जायंट्स यांच्याविरुद्ध प्रत्येकी दोनवेळा खेळणार, तर ग्रुप बी मधील चेन्नई सुपर किंग्सविरुद्धही दोन सामने होतील आणि उर्वरित संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना