Join us  

'पहिल्या डावात वर्चस्व ही यशाची गुरुकिल्ली'

व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितात...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 6:49 AM

Open in App

वन-डे मालिकेतील दारुण पराभवाआधी भारतीय संघाने दौऱ्याची सुरुवात ज्या प्रमाणे टी-२० मालिका विजयासह केली, तशीच सांगता कसोटी मालिकेतील विजयाने करण्यास उत्सुक असेल. मी दोन्ही संघांमध्ये अटीतटीची मालिका पाहू इच्छितो. न्यूझीलंडला त्यांच्याच घरी धूळ चारणे फार कठीण आहे. मात्र, मागील काही वर्षांत भारताने जगाच्या प्रत्येक कोपºयात यशस्वी कामगिरी केली आहे.

विदेशात भारताला विजय मिळवून देण्यासाठी वेगवान गोलंदाजांनी वेगळेडावपेच आखले असतील. तथापि, विजयासाठी माझ्यामते फलंदाजांची भूमिका मोठी ठरेल. आघाडीची फळी, सलामीवीर आणि तिसºया स्थानावरील फलंदाजाला अधिकाधिक वेळ क्रीझवर राहावे लागेल. पहिल्या डावात मोठी कामगिरी हीच भारताच्या विदेशातील यशाची गुरूकिल्ली ठरणार आहे. सध्याच्या भारतीय संघाचे अनेक खेळाडू आधीही न्यूझीलंडमध्ये खेळले आहेत. त्यामुळे खेळपट्टी, परिस्थिती आणि गोलंदाजी मारा या सर्व गोष्टींची पुरेशी कल्पना असावी. सराव सामन्यात मयांक अग्रवाल याला धावा काढताना पाहणे सुखद होते. दोन्ही वेळा सलामीला आल्यामुळे पृथ्वी शॉ याच्यासोबत मयांक चांगला खेळेल असे वाटते. मात्र निवडकर्त्यांनी शभमान गिल याच्यासोबत चर्चा केली असावी. त्यांना काय अपेक्षा आहेत, याची माहिती दिली असावी. अखेर एका दिवसात संभाव्य सलामीवीर तसेच मधल्या फळीतील संभाव्य संयोजन तयार करणे सोपे नसते.हनुमा विहारी याने हॅमिल्टन येथे शतक ठोकले याचा मला आनंद आहे. भारताने ज्यावेळी पाच गोलंदाज खेळविले तेव्हा हनुमा विहारीला बाहेर बसावे लागले. आता चेतेश्वर पुजारासोबत खेळपट्टीवर तो स्थिरावेल तेव्हा तो चांगल्या धावा काढू शकेल यात शंका नाही. या लहान मालिकेत भारताने सहा फलंदाजांसह खेळावे, असा माझा आग्रह असेल. रिद्धिमान साहा यष्टिरक्षक असेल तर पाच गोलंदाजांमध्ये तीन वेगवान गोलंदाज असू शकतील.ईशांत शर्मा हा जोखिम मुक्त प्रस्ताव आहे, असे संघ व्यवस्थापनाला वाटत असेल तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीसह तो खेळताना दिसेल.बुमराह वन-डे मालिकेत प्रभावहिन ठरला होता. मात्र लाल चेंडूने गुणवत्ता सिद्ध करण्यास त्याला वाव आहे.सहा महिन्यानंतर बुमराह लाल चेंडू हाताळणार आहे. ईशांतच्या फिटनेसबाबत शंका असेल तर उमेश यादवला संधी देण्यास हरकत नाही. भारतात खेळपट्टीची तितकी साथ नसताना उमेश यशस्वी ठरतो, हे ध्यानात ठेवून त्याची वर्णी लावण्यात यावी.विश्व चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडला गुणांची गरज आहे. त्यासाठी ते कुठलीही संधी सोडणार नाहीत, त्याचवेळी भारताला संधीचा लाभ घ्यावाच लागेल. एकूणच ही मालिका धडाकेबाज होईल, यात शंका नाही. (गेमप्लान)

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध न्यूझीलंड