वायनाड (केरळ) : उमेश यादवच्या करिअरमधील उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर विदर्भाने रणजी करंडक उपांत्य सामन्याच्या पहिल्या दिवशी पहिल्या डावात केरळचा १०६ धावांत खुर्दा उडवला. गुरुवारी खेळ संपला तेव्हा विदर्भाने पाच गड्यांच्या मोबदल्यात १७१ धावा उभारल्या होत्या. पाहुण्या संघाला ६५ धावांची आघाडी मिळाली आहे. कर्णधार फैज फझल याने आकर्षक ७५ धावा ठोकल्या.
उमेशने ४८ धावांत ७ गडी बाद केले. प्रथमश्रेणी कारकिर्दीतील ही त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. याआधी उमेशने ७४ धावात ७ गडी बाद केले होते. अन्य तीन फलंदाजांना वेगवान रजनीश गुरबानी याने बाद केले. विदर्भाने केवळ तीन गोलंदाजांचा वापर केला.
नाणेफेक जिंकून विदर्भाने केरळला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. उमेशने पहिल्या षटकापासूनच यजमान फलंदाजांवर वर्चस्व गाजविले. त्याच्या वेगवान आणि सरळ येणाऱ्या चेंडूंपुढे केरळच्या फलंदाजांची घसरगुंडी झाली. तळाचा फलंदाज विष्णू विनोद याने (नाबाद ३७ धावा) थोडाफार प्रतिकार केला नसता तर केरळला तिहेरी आकडा गाठणे कठीण झाले असते. कर्णधार सचिन बेबीने २२ आणि बासिल थम्पी याने दहा धावा केल्या.
प्रारंभी उमेशच्या माºयापुढे तासाभरातच केरळची अवस्था ५ बाद ४० अशी झाली होती. विष्णू विनोद याने एक बाजू लावून धरली; पण उमेशने दुसºया बाजूने जलज सक्सेना, बासिल थम्पी आणि संदीप वॉरियार यांना तंबूची वाट दाखविली.
गुरबानीने निधीशला बाद करताच केरळचा डाव १०६ धावांवर संपुष्टात आला. याबरोबरच उमेश यादवने २६ डावांत सातव्यांदा एका डावात ५ बळी घेण्याची किमया साधली.
उत्तरादाखल विदर्भाचा सलामीवीर संजय रामास्वामी (१९) लवकर बाद झाला. यानंतर कर्णधार फैज आणि अनुभवी वसीम जाफर (३४) यांनी दुसºया गड्यासाठी ८० धावांची भागीदारी केली. एमडी निधीशने जाफरचा बळी घेतला. मात्र त्यानंतर विदर्भाचे फलंदाज लवकर बाद झाले. विदर्भाने दिवसअखेर पाच गडी गमावले. त्यात फझलचा देखील समावेश होता. संदीप वॉरियरने ४६ धावांत दोन गडी बाद केले.
Web Title: Khurda from Kerala for 106 runs from Vidarbha
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.