संयुक्त अरब अमिराती येथे सुरू असलेल्या Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आतापर्यंत मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल या किंग्स इलेव्हन पंजाबच्या ( KXIP) फलंदाजांना शतक झळकावता आलेले आहे. आतापर्यंत झालेल्या 23 सामन्यांत चौकार-षटकारांचाही धो धो पाऊस पडला. पण, आयपीएलमधील फलंदाजापेक्षा सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती पाकिस्तानी फलंदाजाची. पाकिस्तानचा फलंदाज खुशदीप शाह यानं शुक्रवारी स्वतःचे नाव विक्रमाच्या यादीत नोंदवलं. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा पाकिस्तानी खेळाडूचा विक्रम त्यानं नावावर केला. यासह त्यानं टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
नॅशनल ट्वेंटी-20 कपमध्ये 25 वर्षीय खुशदीलनं साऊदर्न पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करताना त्यानं केवळ 35 चेंडूंत शतक पूर्ण केलं. जगातील ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणाऱ्या फलंदाजांत तो संयुक्तपणे पाचव्या स्थानावर पोहोचला. त्यानं 8 चौकार व 9 खणखणीत षटकार खेचले. सिंध संघानं 3 बाद 216 धावा चोपल्या, प्रत्युत्तरात पंजाब संघाचे 4 फलंदाज 43 धावांत माघारी परतले होते. पण, खुशदीलनं 35 चेंडूंत शतक पूर्ण केलं. त्यानं पाकिस्तानी फलंदाज अहमद शहजाद याचा विक्रम मोडला. शहजादनं बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये 2012मध्ये 40 चेंडूंत शतक झळकावलं होतं. खुशदीलनं या खेळीसह संघाला 2 विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
ट्वेंटी-20 सर्वात जलद शतक मारणाऱ्या फलंदाजांत खुशदील संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहे. ख्रिस गेल ( 30 चेंडू), रिषभ पंत ( 32), विहान लुब्बे ( 33) आणि अँड्य्रू सायमंड्स ( 34) हे आघाडीवर आहेत. रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त 35 चेंडूंत शतक झळकावले.
Web Title: Khushdil Shah sets new record of fastest T20 century by a Pakistani
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.