मुंबई : आजपासून आयपीएलच्या 16व्या हंगामाची सुरूवात होत आहे. यंदाची आयपीएलची स्पर्धा इतर हंगामाच्या तुलनेत फारच वेगळी असणार आहे, कारण या हंगामात 12 खेळाडूंसह कर्णधार आपले नशीब आजमावणार आहे. कारण IPLमध्ये प्रथमच इम्पॅक्ट प्लेयरचा नियम लागू करण्यात आला आहे. याशिवाय कर्णधार आता वाईड बॉल आणि कमरेच्या वर चेंडू असल्यास नो बॉलसाठी चौथ्या अम्पायरची मदत घेण्यासाठी रिव्ह्यू घेऊ शकतो. आगामी हंगामात खेळाडूंसह प्रशिक्षकांवर देखील सगळ्यांचे लक्ष असणार आहे. कारण एकेकाळी आयपीएल गाजवणारे दिग्गज आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत असणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया सर्व संघांच्या प्रशिक्षकांची फळी.
मुंबई इंडियन्स -सचिन तेंडुलकर (आयकॉन), झहीर खान (ग्लोबल हेड ऑफ क्रिकेट डेव्हलपमेंट), महेला जयवर्धने (ग्लोबल हेड ऑफ परफॉर्मेंस), मार्क बाउचर (मुख्य प्रशिक्षक), शेन बॉन्ड (गोलंदाजी प्रशिक्षक), कायरन पोलार्ड (फलंदाजी प्रशिक्षक), अरूणकुमार जगदीश (सहाय्यक फलंदाजी प्रशिक्षक), जेम्स पॅमेंट (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक),
चेन्नई सुपर किंग्ज -स्टीफन फ्लेमिंग (मुख्य प्रशिक्षक), मायकल हसी (फलंदाजी प्रशिक्षक), ड्वेन ब्राव्हो (गोलंदाजी प्रशिक्षक), राजीव कुमार (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक),
सनरायझर्स हैदराबाद -ब्रायन लारा (मुख्य प्रशिक्षक), सायमन हेल्मोट (सहाय्यक प्रशिक्षक), डेल स्टेन (गोलंदाजी प्रशिक्षक), मुथैया मुरलीधरण (स्पिन प्रशिक्षक), हेमांग बदानी (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक).
कोलकाता नाईट रायडर्स -चंद्रकांत पंडित (मुख्य प्रशिक्षक), डेव्हिड हसी (मार्गदर्शक), अभिषेक नायर (सहाय्यक प्रशिक्षक), भरत अरूण (गोलंदाजी प्रशिक्षक), रयान टेन डोशेट (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक).
राजस्थान रॉयल्स -कुमार संगकारा (मुख्य प्रशिक्षक), लसिथ मलिंगा (गोलंदाजी प्रशिक्षक), दिशांत याग्निक (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक).
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू -संजय बांगर (मुख्य प्रशिक्षक), श्रीधरन श्रीराम (फलंदाजी आणि स्पिन गोलंदाजी प्रशिक्षक), एडम ग्रिफिथ (गोलंदाजी प्रशिक्षक), मालोलन रंगराजन (क्षेत्ररक्षण प्रशिक्षक).
गुजरात टायटन्स -आशिष नेहरा (मुख्य प्रशिक्षक), गॅरी कस्टन (मार्गदर्शक आणि गोलंदाजी प्रशिक्षक).
लखनौ सुपर जायंट्स -गौतम गंभीर (मार्गदर्शक), अॅंडी फ्लावर (मुख्य प्रशिक्षक), अॅँडी बिकेल (गोलंदाजी प्रशिक्षक).
दिल्ली कॅपिटल्स - रिकी पॉंटिग (मुख्य प्रशिक्षक), शेन वॉटसन (सहाय्यक प्रशिक्षक),
पंजाब किंग्ज -ट्रेव्हर बेलिस (मुख्य प्रशिक्षक), वसीम जाफर (फलंदाजी प्रशिक्षक),
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"