Join us  

किरोन पोलार्डला दंड

सामना फीच्या २० टक्के दंड आणि एक डि मेरिट गुणाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 3:55 AM

Open in App

दुबई : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किरोन पोलार्ड याने भारताविरोधात फ्लोरिडातील दुसऱ्या सामन्यात पंचाचे निर्देश मानले नाहीत. त्यामुळे त्याच्यावर सामना फीच्या २० टक्के दंड आणि एक डि मेरिट गुण अशी कारवाई करण्यात आली.आयसीसीने म्हटले की, पोलार्डने आचारसंहितेच्या २.४ या कलमाचे उल्लंघन केले आहे. पोलार्डने मैदानावर एक सबस्टिट्युट बोलावला होता. तर पंचाचे म्हणणे होते की त्याने त्यासाठी आधी सुचना द्यायला हवी होती. आणि षटकांच्या अखेरीपर्यंत वाट बघायला हवी होती. मात्र पोलार्डने असे केले नाही.पोलार्ड याने आरोपांचे खंडन केले आहे. त्यामुळे सामनाधिकारी जेफ क्रो यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. आयसीसीने म्हटले की,‘ पोलार्ड या प्रकरणात दोषी असल्याचे समोर आले. त्याला सामना फीच्या २० टक्के दंड सुनावण्यात आला. आणि त्याच्यावर एक डीमेरीट गुणाची कारवाई करण्यात आली.’ दोन वर्षात कोणत्याही खेळाडूवर चार किंवा अधिक डिमेरिट गुण लावले तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते.