Kieron Pollard, IPL 2022 MI vs RR Live: मुंबई इंडियन्सची स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यातही सुरूच असल्याचं दिसून आलं. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) मुंबईला २३ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना जॉस बटलरच्या (Jos Buttler) शतकाच्या जोरावर राजस्थानने १९३ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इशान किशन (Ishan Kishan) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) यांनी मुंबईच्या (Mumbai Indians) विजयाच्या आशा जागवल्या होत्या. पण अखेर मुंबई इंडियन्सला पराभव स्वीकारावा लागला.
राजस्थानने दिलेल्या १९४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या डावाची सुरूवात अतिशय खराब झाली. रोहित शर्मा आणि अनमोलप्रीत सिंग दोघेही स्वस्तात माघारी परतले. पण त्यानंतर मुंबई संघाची 'डावी आघाडी' इशान किशन आणि तिलक वर्मा या दोघांनी दमदार कामगिरी केली. या दोघांनीही फटकेबाजी करत अर्धशतकं ठोकली. इशान किशनने ५ चौकार आणि एक षटकारासह ५४ धावा केल्या. तर तिलक वर्माने ३३ चेंडूत ३ चौकार ५ षटकारांसह ६१ धावा केल्या.
तिलक वर्माची दमदार खेळी
--
इशान किशनची फटकेबाजी
त्यानंतर युजवेंद्र चहल आणि आर अश्विन यांनी मुंबई इंडियन्सवरील दबाव कायम ठेवला. किरॉन पोलार्डच्या खांद्यावर जबाबदारी असताना टीम डेव्हिड लगेच माघारी परतला. त्यानंतर पोलार्डने बाऊंडरीच्या नादात धावून रन्स घेण्याचा प्रयत्नच केला नाही. त्यामुळे मुंबईला शेवटच्या षटकात २९ धावांची गरज होती. अशा परिस्थितीत सुद्धा पोलार्डला फटकेबाजी करता आली नाही. पोलार्डने २४ चेंडूत २२ धावा केल्या. त्यापैकी सुमारे १६ चेंडू डॉट बॉल्स होते. अखेर मुंबईला २० षटकात ८ बाद १७० धावाच करता आल्या.
जोस बटलरची धुवांधार शतकी खेळी
राजस्थानच्या डावात यशस्वी जैस्वाल (१) आणि देवदत्त पडीक्कल (७) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर जोस बटलरने तुफान फटकेबाजी केली. त्याने बेसिल थंपीला एका षटकात २६ धावा झोडल्या. संजू सॅमसन ३० धावांवर बाद झाल्यानंतर शिमरॉन हेटमायरने बटलरला साथ देत १४ चेंडूत ३५ धावा केल्या. जोस बटलरने १९व्या षटकापर्यंत तग धरला. त्याने तुफानी खेळी करत शतक ठोकलं. जोस बटलरने ६८ चेंडूत ११ चौकार आणि ५ षटकारांच्या साथीने १०० धावांची धुवांधार खेळी केली.
Web Title: Kieron Pollard IPL 2022 MI vs RR Live Rajasthan Royals beat Mumbai Indians Ishan Kishan Tilak Varma Rohit Sharma Jos Buttler
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.