Join us  

मुंबईसाठी किएरॉन पोलार्ड ठरला ‘लॉर्ड’

गतविजेत्यांनी मिळवला थरारक विजय; चेन्नई सुपरकिंग्सची विजयी मालिका खंडित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 2:01 AM

Open in App
ठळक मुद्देलहान सीमारेषेचा पुरेपूर फायदा घेत पोलार्डने चेन्नईच्या हातून सामना हिसकावून नेला. १८व्या षटकात डूप्लेसिसने सोडलेला पोलार्डचा झेल निर्णायक ठरला

अयाज मेमन

नवी दिल्ली : तुमचा अंबाती रायुडू, तर आमचा किएरॉन पोलार्ड... जणू काही याच तोऱ्यात खेळलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सने भन्नाट विजय मिळवताना कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपरकिंग्सला ४ गड्यांनी नमवले. तब्बल ४३७ धावांचा पाऊस पडलेला हा सामना गाजवला तो पोलार्डने.प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर चेन्नईने रायुडू, मोइन अली आणि फाफ डूप्लेसिस यांच्या जोरावर ४ बाद २१८ धावा उभारल्या. मात्र मुंबईने एकट्या पोलार्डच्या जोरावर ६ बाद २१९ धावा केल्या. पोलार्डने एकहाती विजय मिळवून देताना ३४ चेंडूंत ६ चौकार व ८ षटकारांचा पाऊस पाडत नाबाद ८७ धावा चोपल्या. हा सामना सबकुछ पोलार्ड असाच ठरला.

लहान सीमारेषेचा पुरेपूर फायदा घेत पोलार्डने चेन्नईच्या हातून सामना हिसकावून नेला. १८व्या षटकात डूप्लेसिसने सोडलेला पोलार्डचा झेल निर्णायक ठरला. क्विंटन डीकॉक व रोहित शर्मा यांनी अर्धशतकी सलामी दिल्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. मात्र पोलार्डने  अवघ्या १७ चेंडूंत अर्धशतक झळकावत एकहाती सामना फिरवला. या शानदार विजयानंतर इतर संघ आता मुंबईचा धसका घेतील. कारण मुंबई संघाने फॉर्म मिळवला असून सर्व प्रमुख फलंदाजांना लय सापडली आहे. चेन्नईसाठी हा मोठा धक्का असून त्यांनी सलग पाच सामन्यांनंतर पहिला पराभव पत्करला आहे. पोलार्डने आपला अनुभव दाखवून दिला. चेन्नईकडून सॅम कुरेनने जबरदस्त मारा केला. भविष्यात तो सर्वोत्तम अष्टपैलू बनेल. त्याआधी मोइन अली व अंबाती रायुडू यांनी मुंबईकरांची जबरदस्त धुलाई केली. फाफ डूप्लेसिसने सलग चौथे अर्धशतक झळकावत या दोघांना मोलाची साथ दिली. त्यामुळेच चेन्नईने बघता बघता धावांचा एव्हरेस्ट उभारला. पहिल्याच षटकात ऋतुराज गायकवाडच्या रूपाने धक्का बसल्यानंतर डूप्लेसिस आणि मोइन यांनी १०८ धावांची भागीदारी केली. 

पोलार्डने १२व्या षटकात डूप्लेसिस आणि सुरेश रैना यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद करत चेन्नईच्या धावगतीला ब्रेक दिला. मात्र यानंतर सामना फिरवला तो  रायुडूने. त्याने २६६.६६ च्या भन्नाट स्ट्राईक रेटने फटकेबाजी करत चेन्नईला दोनशेपलीकडे नेले. केवळ २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. रायुडू व रवींद्र जडेजाने पाचव्या गड्यासाठी १०२ धावांची भागीदारी केली. यामुळे चेन्नईने ४ बाद ११६ धावांवरून ४ बाद २१८ अशी झेप घेतली.

महत्त्वाचेnमुंबई इंडियन्सने धावांचा पाठलाग करताना अखेरच्या १० षटकांत सर्वाधिक १३८ धावा काढण्याचा विक्रम केला.nकिएरॉन पोलार्ड मुंबई इंडियन्सकडून सर्वात वेगवान अर्धशतक झळकावले. यंदाच्या सत्रातील हे सर्वाधिक वेगवान अर्धशतकही ठरले.nपोलार्डने सीएसकेविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम करताना विराट कोहलीला मागे टाकले.nरोहित शर्मा ३५० टी-२० सामना खेळणारा पहिला भारतीय ठरला.nसुरेश रैनाने २००वा आयपीएल सामना खेळला.nयंदाच्या आयपीएलमध्ये सीएसकेने चौथी शतकी भागीदारी केली.nआयपीएलमध्ये दुसऱ्यांदा जसप्रीत बुमराहने ५०हून अधिक धावा दिल्या.nअंबाती रायुडूने सीएसकेकडून तिसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक झळकावले.nसीएसकेकडून सलग चार अर्धशतक झळकावणारा फाफ डूप्लेसिस पहिला फलंदाज ठरला.

 

तो झले सुटला आणि...शार्दुल ठाकूरने टाकलेल्या १८व्या षटकातील पाचवा चेंडू पोलार्डने उंच टोलावला. मात्र, पोलार्डचा हा झेल चक्क फाफ डूप्लेसिसच्या हातून सुटला आणि इथेच चेन्नईने सामना गमावला. त्या वेळी पोलार्ड ६८ धावांवर खेळत होता. हा झेल पकडला गेला असता, तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.३० षटकारांची मेजवाजीचेन्नई सुपरकिंग्सच्या फलंदाजांनी तुफानी हल्ला करताना मुंबईकरांविरुद्ध १६ षटकार ठोकले. यामध्ये मोईन अलीने ५, फाफ डूप्लेसिसने ४, तर अंबाती रायुडूने ७ षटकार मारले. मुंबईकरांनीही याची काही प्रमाणात भरपाई करताना १४ षटकार मारले. यामध्ये एकट्या पोलार्डने ८ षटकार खेचले, तर कृणाल व हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी २ आणि क्विंटन डीकॉक व रोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक षटकार मारला. या सामन्यात एकूण ३० षटकारांचा पाऊस पडला.

 

टॅग्स :आयपीएल २०२१मुंबई इंडियन्स