Kieron Pollard Mumbai Indians NY: वेस्ट इंडिजचा दिग्गज कायरन पोलार्ड आपल्या धमाकेदार कामगिरीने फलंदाजांमध्ये नेहमीच भीती निर्माण करताना दिसतो. कोणत्याही गोलंदाजाला पोलार्ड समोर येताच घाम फुटतो. पण नुकत्याच एका सामन्यात एक वेगळी घटना घडली. गोलंदाजाऐवजी पोलार्डच्या फटक्याने एक महिला चाहती जखमी झाली. ही घटना मेजर लीग क्रिकेटमध्ये झाली. तेथे पोलार्डने कर्णधारपदाला साजेशी खेळी करून आपल्या संघाला प्ले-ऑफचे तिकीट मिळवून दिले.
महिला फॅनच्या हाताला लागला चेंडू
कायरन पोलार्डने अवघ्या १२ चेंडूत ३३ धावांची दमदार खेळी केली. या खेळीत त्याने तीन षटकार आणि दोन चौकार खेचले. यातील एका षटकारामुळे एक महिला चाहती जखमी झाली. पोलार्डने स्पेन्सर जॉन्सनच्या चेंडूवर षटकार ठोकला. पोलार्डने तिसरा षटकार मारला आणि तो चेंडू थेट त्याचा संघ एमआय न्यूयॉर्कला सपोर्ट करणाऱ्या महिला चाहतीच्या हाताला लागला. सामना संपल्यानंतर पोलार्डने त्या चाहतीची भेट घेत तिला सेल्फी फोटो काढून दिला. पाहा व्हिडीओ-
पोलार्डचा संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचला!
कायरन पोलार्डच्या संघाने लॉस एंजेलिस नाइट रायडर्सने दिलेले १३१ धावांचे लक्ष्य ३ षटके राखून पूर्ण केले. या सामन्यात एमआय न्यूयॉर्कने ४ गडी राखून सामना जिंकला आणि प्लेऑफचे तिकीट मिळवले.