टायगर जिंदा है! किरॉन पोलार्डची ८ चौकार, ६ षटकारांची आतषबाजी; तरीही DC कडून हरला MI चा संघ 

मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) याने इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती घेत चाहत्यांना धक्का दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 02:28 PM2023-01-23T14:28:14+5:302023-01-23T14:28:31+5:30

whatsapp join usJoin us
Kieron Pollard smashed 86 off 38 balls with 8 FOURS AND 6 MASSIVE SIXES! OUTSTANDING captains innings in International League T20 | टायगर जिंदा है! किरॉन पोलार्डची ८ चौकार, ६ षटकारांची आतषबाजी; तरीही DC कडून हरला MI चा संघ 

टायगर जिंदा है! किरॉन पोलार्डची ८ चौकार, ६ षटकारांची आतषबाजी; तरीही DC कडून हरला MI चा संघ 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) याने इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती घेत चाहत्यांना धक्का दिला. तो आता आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून मुंबई इंडियन्ससोबत काम करणार आहे. पण, तो मुंबई इंडियन्सच्या MI Emirates या संघाचे आंतरराष्ट्रीय लीग ट्वेंटी-२०त ( International League T20) नेतृत्व करत आहे आणि रविवारी अबु धाबीच्या स्टेडियमवर पोलार्डचे वादळ घोंगावले. Dubai Capitals विरुद्धच्या सामन्यात पोलार्डने दमदार फटकेबाजी केली, परंतु जो रूट व रोव्हमन पॉवेल यांच्यामुळे MI Emirates ला पराभव पत्करावा लागला.

प्रथम फलंदाजी करताना  Dubai Capitalsने ३ बाद २२२ धावांचा डोंगर उभा केला. रॉबिन उथप्पा २६ धावांवर माघारी परतल्यानंतर जो रूट व कर्णधार पॉवेल यांनी इमिरेट्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. रूटने ५४ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली, तर पॉवेलने ४१ चेंडूंत ४ चौकार व १० षटकारांसह ९७ धावा चोपल्या. पॉवेलने पोलार्डच्या गोलंदाजीवर MS Dhoni स्टाईल मारलेला षटकार चर्चेचा विषय ठरला.



इमिरेट्सची सुरुवात निराशाजनक झाली. पण, पोलार्ड खिंड लढवत होता. आंद्रे फ्लेचर ( ३६) व नजिबुल्लाह झाद्रान ( ३०) यांनी काही काळ पोलार्डला साथ दिली. पोलार्डने ३८ चेंडूंत ८ चौकार व ६ षटकारासह ८६ धावा केल्या. इमिरेट्सला ५ बाद २०६ धावाच करता आल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Kieron Pollard smashed 86 off 38 balls with 8 FOURS AND 6 MASSIVE SIXES! OUTSTANDING captains innings in International League T20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.