मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड ( Kieron Pollard) याने इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती घेत चाहत्यांना धक्का दिला. तो आता आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून मुंबई इंडियन्ससोबत काम करणार आहे. पण, तो मुंबई इंडियन्सच्या MI Emirates या संघाचे आंतरराष्ट्रीय लीग ट्वेंटी-२०त ( International League T20) नेतृत्व करत आहे आणि रविवारी अबु धाबीच्या स्टेडियमवर पोलार्डचे वादळ घोंगावले. Dubai Capitals विरुद्धच्या सामन्यात पोलार्डने दमदार फटकेबाजी केली, परंतु जो रूट व रोव्हमन पॉवेल यांच्यामुळे MI Emirates ला पराभव पत्करावा लागला.
प्रथम फलंदाजी करताना Dubai Capitalsने ३ बाद २२२ धावांचा डोंगर उभा केला. रॉबिन उथप्पा २६ धावांवर माघारी परतल्यानंतर जो रूट व कर्णधार पॉवेल यांनी इमिरेट्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. रूटने ५४ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ८२ धावांची खेळी केली, तर पॉवेलने ४१ चेंडूंत ४ चौकार व १० षटकारांसह ९७ धावा चोपल्या. पॉवेलने पोलार्डच्या गोलंदाजीवर MS Dhoni स्टाईल मारलेला षटकार चर्चेचा विषय ठरला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"