इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून म्हणजेच आता अवघ्या ६ दिवसांत सुरूवात होणार आहे. जवळपास सर्वच संघ महिनाभर आधीच युएईत दाखल झाले आहेत आणि काही खेळाडू कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2021) नुसता धुरळा करत आहेत... मुंबई इंडियन्सचा हुकूमी एक्का असलेल्या किरॉन पोलार्डनं ( Kieron Pollard) रविवारी २० चेंडूंत वादळी खेळी करताना शाहरूख खान याच्या संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. पण, मुंबई इंडियन्सला भारी आनंद झाला. तेच दुसरीकडे याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सची चिंता वाढवणारी बातमीही समोर आली आहे.
त्रिनबागो नाइट रायडर्स ( Trinbago Knight Riders) विरुद्ध सेंट किट्स अँड नेव्हीस पॅट्रीओट्स ( St Kitts and Nevis Patriots) यांच्यातल्या सामन्यात पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रायडर्सनी ४ विकेट्स व ६ चेंडू राखून विजय मिळवला. सेंट किट्सनं प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १४७ धावा केल्या. जोशूआ डी सिल्वानं ४५ चेंडूंत ५० धावा ( ५ चौकार व १ षटकार) केल्या. शेर्फाने रुथरफोर्ड ( २५) व कर्णधार ड्वेन ब्राव्हो यानं १३ चेंडूंत २५ धावा चोपून संघाच्या धावसंख्येत हारभार लावला. पण, त्यानं मागील दोन सामन्यांत गोलंदाजी केलेली नाही. तो दुखापतीतून सावरलेला नाही आणि आयपीएलच्या तोंडावर चेन्नई सुपर किंग्ससाठी ही चिंता वाढवणारी गोष्ट ठरू शकते. ( Dwayne Bravo scored 25 runs from just 13 balls against TKR but he is yet to ball in the last 2 matches, hopefully a good recovery going on and bowl for CSK in IPL 2021.)