Join us  

मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या संघात नेतृत्व बदलाची खांदेपालट; बघा कोण नवा कर्णधार 

मुंबई इंडियन्स फ्रँचायझी सध्या कर्णधार बदल करण्याच्या मोहिमेला निघाल्याचे दिसतेय...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 3:54 PM

Open in App

 (Marathi News) : मुंबई इंडियन्स फ्रँचायझी सध्या कर्णधार बदल करण्याच्या मोहिमेला निघाल्याचे दिसतेय... इंडियन प्रीमिअर लीग २०२४ पूर्वी त्यांनी गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला पुन्हा आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. त्यानंतर रोहित शर्माला बाजूला सारून हार्दिककडे आयपीएल २०२४ साठी MI च्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. फ्रँचायझीचा हा निर्णय चाहत्यांच्या आजही पचनी पडलेला नाही. त्यात त्यांनी आणखी एकदा नेतृत्वबदलाची घोषणा केली. मुंबई इंडियन्स फ्रँचायाझीची दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीग आणि यूएईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० लीगमध्ये गुंतवणूक आहे. SAT20 लीग अर्थात दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीग मध्ये MI Cape Town हा त्यांचा संघ आहे.

मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने आगामी SAT20 लीगसाठी MI Cape Town संघाचे नेतृत्व किरॉन पोलार्डकडे सोपवण्याचा निर्णय आज जाहीर केला. १० जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे. यापूर्वी MI Cape Town चे नेतृत्व राशीद खानकडे होते, परंतु तो दुखापतग्रस्त आहे आणि यंदाच्या लीगमध्ये खेळणे अवघड आहे. त्यात भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठीच्या संघात त्याचे नाव आहे. त्यामुळे फ्रँचायझीने MI Cape Town चे नेतृत्व पोलार्डकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी राशीदला लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

त्याचवेळी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० लीगमधील MI Emirates संघाचा कर्णधार म्हणून निकोलस पूरनचे नाव जाहीर केले गेले आहे. २०२३ मध्ये पोलार्डने या स्पर्धेत MI Emirates चे नेतृत्व सांभाळले होते. निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली MI New York ने MLC मेजर लीग क्रिकेटच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता.

 

टॅग्स :मुंबई इंडियन्सकिरॉन पोलार्डटी-20 क्रिकेट