प्रीव्ह्यू । आजचा सामनादुबई : किं ग्स इलेव्हन पंजाबचा संघ गुरुवारी ज्यावेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्धच्या लढतीसाठी मैदानात उतरेल त्यावेळी इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सामन्यात ‘शॉर्ट रन’चा वादग्रस्त निर्णय विसरून शानदार कामगिरी करण्यास प्रयत्नशील राहील.रॉयल चॅलेंजर बँगलोरने (आरसीबी) सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आपली मोहीम १० धावांनी विजय मिळवीत सुरू केली आणि यंदाच्या मोसमात परिस्थिती त्यांच्यासाठी अनुकूल राहील, असे संकेत दिले.
आयपीएलमध्ये उमेश यादव महागडा ठरण्याचा क्रम कायम राहिला आहे. पहिल्या लढतीतील त्याची कामगिरी बघता त्याच्या स्थानी मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते. संघ इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीला मधल्या फळीत कसे फिट करते, याबाबत उत्सुकता आहे.वेदर रिपोर्ट । तापमान ४१ डिग्री सेल्सिअसच्या जवळपास राहील. ह्युमिडिटी ३० टक्के राहण्याची शक्यता तर वाऱ्याचा वेग २३ किलोमीटर प्रतितास असू शकतो.पिच रिपोर्ट । खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल. सोमवारी झालेल्या लढतीत राशिद खान व युजवेंद्र चहल यांना खेळपट्टीकडून बरीच मदत मिळाली. फलंदाजांना फिरकीपटूंविरुद्ध सांभाळून खेळावे लागेल.मजबूत बाजू
बँगलोर। सोमवारी मिळालेल्या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहल महत्त्वाचा असेल.राजस्थान। मयंक अग्रवाल चांगल्या फॉर्मात आहे. राहुल, ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारख्या फलंदाजांची उपस्थिती. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व युवा लेग स्पिनर रवी बिश्नोईसुद्धा फॉर्मात आहेत.कमजोर बाजूबँगलोर। दुखापतग्रस्त असल्यामुळे अष्टपैलू ख्रिस मॉरिस खेळू शकणार नाही. त्याला स्नायूच्या दुखापतीने सतावले आहे.राजस्थान। मधल्या फळीतील फलंदाजांना पहिल्या लढतीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यांना चांगल्या सुरुवातीचा लाभ घ्यावा लागेल.