Join us  

IPL 2020 : मोठी बातमी; टीम इंडियाच्या त्रिशतकवीर फलंदाजाला झाला होता कोरोना

IPL 2020 : संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे रवाना होण्यापूर्वी खेळाडूंची होणार दोन वेळा कोरोना चाचणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 9:49 AM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13 व्या मोसमासाठीची सर्व तयारी झाली आहे. तारीख ठरली आहे, केंद्र सरकारकडून परवानगीही मिळाली आहे, खेळाडूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे सर्व 8 संघांसाठीच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे. कोरोना व्हायरसचे संकट लक्षात घेता यूएईला रवाना होण्यापूर्वी आणि तेथे दाखल झाल्यानंतर प्रत्येक खेळाडूची कोरोना चाचणी केली जाणार आहे. खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या बाबतीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) कोणतीही तडजोड करणार नाही, हे स्पष्ट आहे.  

आयपीएल सुरू व्हायला अवघ्या एका महिन्याचा कालावधी शिल्लक असताना टेंशन वाढवणारे वृत्त समोर आले आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत यूएईत आयपीएल खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  आयपीएलसाठी रवाना होण्यापूर्वी माजी विजेत्या राजस्थान रॉयल्स संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक दिशांत याग्निक यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दिशांत हे सध्या उदयपूर येथे आहेत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केले असून 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला दिला गेला आहे. 14 दिवसांनंतर दिशांत यांची पुन्हा दोन वेळा चाचणी केली जाईल. दोन टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना यूएईला जाता येईल.   दिशांत यांच्या वृत्तानंतर टीम इंडियाच्या फलंदाजाला कोरोना झाल्याचे वृत्त समोर येत आहे. टीम इंडिया आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा फलंदाज करूण नायर याला कोरोना झाल्याची माहिती समोर येत आहे. दोन आठवड्यापूर्वी त्याला कोरोना झाला होता आणि आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर नायरही अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे घरीच आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) नायर किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार आहे आणि या महिन्याच्या अखेरीत तो संघासोबत संयुक्त अरब अमिरातीला ( यूएई) रवाना होणार आहे. (Karun Nair had tested positive for the novel coronavirus two weeks back)

    यूएईला रवाना होण्यापूर्वी नायरनं ही बातमी संघ व्यवस्थापनाला कळवली. दोन आठवड्यापूर्वी त्याला कोरोना झाला होता आणि त्यानं त्यावर यशस्वी मात केली, असे वृत्त स्पोर्ट्स्टारनं प्रसिद्ध केलं आहे. यूएईला जाण्यापूर्वी पंजाब संघातील प्रत्येक खेळाडूची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यांच्या दोन्ही टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरच त्यांना यूएईला जाता येणार आहे.  (Karun Nair had tested positive for the novel coronavirus two weeks back)

      नायरनं सहा कसोटी सामन्यांत टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केलं आहे. 2016मध्ये चेन्नईत इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत नायरनं नाबाद 303 धावा चोपल्या होत्या. 

      टॅग्स :आयपीएल 2020भारतीय क्रिकेट संघकिंग्ज इलेव्हन पंजाब