कोरोना व्हायरसच्या संकटात हातावर पोट असणाऱ्या मजूरांनी आपल्या गावचा रस्ता धरला आहे. त्यामुळे जमेल तसं आणि मिळेल त्या वाहनानं हे मजूर आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा मजूरांना रस्त्यात अनेक जण मदत करत आहेत आणि त्यात मुंबईचा क्रिकेटपटू सर्फराज खान याचाही समावेश आहे. किंग्स इलेव्हन पंजाबचा हा खेळाडू मुळचा उत्तर प्रदेशचा आणि तेथे येणाऱ्या मजूरांना तो जेवण वाटप करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता या मजूरांना आणखी मदत करता यावी, यासाठी सर्फराजनं ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
Pakistan Plane Crash : विमान अपघातात पाक फिरकीपटू यासीर शाहचा मृत्यू? जाणून घ्या सत्य
'यंदा आम्ही ईद साजरी करणार नाही. ईद साजरी करण्यासाठी आम्ही नवीन कपडे आणि काही वस्तू विकत घ्यायचो. पण आता त्याच पैशांतून मजूरांना मदत करणार आहोत. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्यांनीही पुढाकार घेऊन मदत करावी, अशी विनंती आम्ही करतो,''असे सर्फराज म्हणाला.
''आम्ही लोकांना जेवण व पाण्याचं वाटप करत आहोत. अनेक लोकं आपापल्या गावी जात आहेत. अनेक दिवसांचा प्रवास केल्यांतर ते भुकेनं व्याकुळ अन् तहानलेले आहेत. रमदानला आम्हीही उपवास करतो आणि त्यामुळे आम्हाला पाणी व जेवणाचं महत्त्व माहित आहे,''असे सर्फराजनं सांगितले. रणजी क्रिकेटमध्ये 2019-20च्या मोसमात सर्फराजनं 6 सामन्यांत 928 धावा केल्या आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
शाहिद आफ्रिदीनं दिली घटनास्थळी भेट, पाकिस्तानी फॅन्सनी घेतला समाचार
चार दिवसांपूर्वी झालेलं वडिलांचं निधन, तरीही मैदानावर उतरून सचिननं ठोकलं शतक!
15 वर्षीय ज्योतिनं जिंकलं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष्यांच्या मुलीचं मन
इरफान पठाणनं मुस्लीम बांधवांना केलं आवाहन; पाहा Video
सौरव गांगुली अन् जय शाह यांच्यासाठी घटनाबदल; BCCIची सर्वोच्च न्यायालयात धाव
Video : शोएब मलिकच्या एका सवयीचा सानिया मिर्झाला येतो प्रचंड राग
गौतम गंभीर अन् टीम इंडियाचे माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांच्यात जुंपली
पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना मिळते जेवढी रक्कम, तेवढा विराट कोहलीचा वर्षाचा पगार?
Web Title: Kings XI Punjab batsman Sarfaraz Khan vows to not celebrate Eid, will help migrant workers instead svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.