Join us

KKR चा अष्टपैलू खेळाडू बनला 'बाबा'; मुलाचा फोटो पोस्ट करून दिली गोड बातमी

आमच्या हृदयात रिक्त असलेली जागा आज तू भरून काढलीस. ती जागा रिक्त आहे याची जाणीवच आम्हाला कधी नव्हती. - लिहिली भावनिक पोस्ट

By स्वदेश घाणेकर | Updated: February 2, 2021 10:31 IST

Open in App

कोलकाता नाईट रायडर्सचा ( Kolkata Knight Riders) अष्टपैलू खेळाडू सुनील नरीन ( Sunil Narine) याच्या घरी गोड  बातमी आली आहे. सोमवारी त्याची पत्नी एंजेलिया हिनं मुलाला जन्म दिला. सुनील नरीननं सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ही गोड बातमी दिली. आपल्या घरी लहान पाहुणा येणार आहे, असे नरीननं डिसेंबर महिन्यातच जाहीर केले होते. त्यानंतर त्रिनिदाद-टोबॅगो येथे नरीनच्या बाप बनल्याचा आनंद धुमधडाक्यात साजरा करण्यात आला होता. नरीन यानं पत्नीसह फोटोशूटही केलं होतं. ३४ कोटींच्या घरात राहतेय विराट-अनुष्काची लेक 'वामिका'; पाहा आलिशान घराचे Inside Photo

सुनील नरीननं मुलाचा फोटो पोस्ट करून लिहिलं की,''आमच्या हृदयात रिक्त असलेली जागा आज तू भरून काढलीस. ती जागा रिक्त आहे याची जाणीवच आम्हाला कधी नव्हती. तुझ्या या गोंडस चेहऱ्यात आम्हाला देवाचा चांगुलपणा आणि कृपा दिसत आहे. आमचं तुझ्यावर भरपूर प्रेम आहे.''  क्वारंटाईन कालावधी संपला अन् टीम इंडियाचे शिलेदार मैदानावर सरावासाठी उतरले, See pics

सुनील नरीन सध्या पत्नी एंजेलिया व मुलासोबत नाही. तो सध्या अबु धाबी टी १० लीमध्ये खेळतोय. या लीगमध्ये तो डेक्कन ग्लॅडिएटर्स संघाचा सदस्य आहे आणि त्यानं ३ सामन्यांत ३ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या १४व्या पर्वासाठी कोलकाता नाईट रायडर्सनं सुनील नरीनला रिटेन केलं आहे. २०२१चं आयपीएल त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्यानं त्याच्या गोलंदाजीच्या शैलीत बदल केला आहे. यूएईत झालेल्या आयपीएल २०२०त नरीनला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. 

टॅग्स :कोलकाता नाईट रायडर्सIPL 2020टी-10 लीगवेस्ट इंडिज