Join us  

विराट कोहलीनं झहीर खानची घेतली 'फिटनेस' टेस्ट; पोटावरून उडवली खिल्ली, Video Viral

rcb vs kkr 2023 : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 1:34 PM

Open in App

virat kohli and zaheer khan । बंगळुरू : आयपीएलमध्ये (IPL 2023) काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR vs RCB) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला. चिन्नस्वामी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना केकेआरने निर्धारित २० षटकांत ५ बाद २०० धावा केल्या. प्रत्युत्तरात यजमान आरसीबीचा संघ केवळ १७९ धावा करू शकला आणि २१ धावांनी घरच्या मैदानावर विराटच्या संघाला सामना गमवावा लागला. कर्णधार विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावले पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेल्या विराटने या हंगामात पाचवे अर्धशतक झळकावले. अशातच किंग कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो माजी खेळाडू झहीर खानशी मस्ती करताना दिसत आहे. झहीरची फिटनेस टेस्ट घेताना विराटने केलेले हावभाव पाहण्यासारखे आहेत.

विराटने झहीरची घेतली फिरकी दरम्यान, निवृत्तीनंतर झहीर खान समालोचनाचा आनंद घेत आहे. सामन्यापूर्वी त्याने विराट कोहलीशी संवाद साधला आणि मजेशीरपणे विराटने माजी गोलंदाजाची खिल्ली उडवली. झहीरच्या वाढत्या पोटामुळे विराटने त्याची खिल्ली उडवली. तो त्याच्या पोटावर थाप मारताना दिसला, त्यानंतर स्विंगचा सुल्तान झहीरलाही हसू आवरता आले नाही. 

RCBचा घरच्या मैदानावर पराभवआरसीबीचा काल २१ धावांनी पराभव झाला पण किंग कोहलीने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराटने आयपीएल २०२३ मधले पाचवे अर्धशतक झळकावले आणि ३००+ धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. यासह विराटने काल विश्वविक्रमाची नोंद केली. कोहलीने काल ३७ चेंडूत ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्सविराट कोहलीझहीर खान
Open in App