इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) आणि कॅरेबियन प्रीमिअर लीग ( सीपीएल) मध्ये गुंतवणूक केल्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सचे मालक म्हणजेच बॉलिवूडचा स्टार शाहरुख खान The Hundred लीगमध्ये गुंतवणूक करणार असल्याच्या चर्चा मंगळवारी रंगल्या. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डातर्फे ( ECB) 2020 पासून या लीगचं आयोजन करण्यात येणार होतं, परंतु कोरोना व्हायरसमुळे ही लीग 2021मध्ये घेण्याचा निर्णय घेतला गेला.
ECBच्या या लीगमध्ये KKR खरंच गुंतवणूक करणार आहे का, या प्रश्नावर मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी मैसोर यांनी मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी ECBनं ऑफर दिल्यास तशी गुंतवणूक केली जाईल, असे सांगितले. ब्रिटीश वर्तमानपत्र दी टेलिग्राफनं KKR गुंतवणूक करणार असल्याचे वृत्त प्रसिद्घ केलं होतं. पण, सध्यातरी या सर्व जर तरच्या गोष्टी असल्याचं मैसोर म्हणाले. पण, त्यांनी हे वृत्त फेटाळले नाही.
''या बातमीची चर्चा सुरू आहे, याची कल्पना आहे. जर The Hundred लीगचे आयोजक आमच्याकडे गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव घेऊन आले तर आम्ही त्याचे मुल्यमापन करू, असे मी म्हटले होते. आम्ही आयपीएलमधील मोठं ब्रँड आहोत. त्यामुळे जगातील अन्य लीग KKRसोबत काम करण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील,'' असे मैसोर यांनी सांगितले.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डातर्फे ( ECB) यंदा The Hundred ही लीग होणार होती, परंतु ती 2021मध्ये घेण्याचा निर्ण नुकताच घेतला गेला. या निर्णयानंतर ECBनं लीगसाठी करारबद्ध केलेल्या खेळाडूंचे करारही रद्द केले आणि त्यामुळे खेळाडूंची आर्थिक कोंडी झाली. कोलकोता नाइट रायडर्स संघाव्यतिरिक्त कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील त्रिनिदाद फ्रँचायझीमध्ये 2015साली शाहरुखनं गुंतवणूक केली होती.
Virat Kohli च्या 11 वर्षांच्या सोबत्याचे निधन; अनुष्का शर्मानं वाहिली श्रद्धांजली
Shah Rukh Khan आणखी एक संघ खरेदी करणार; तीन संघांचा मालक होणार
जब मिल बैठेंगे तीन यार; बीअर पिण्यासाठी Ravi Shastri यांनी निवडले दोन क्रिकेटपटू
धक्कादायक : ब्राझिलच्या स्टार फुटबॉलपटूच्या Ex-Girlfriend ला अटक