चुकीच्या रणनीतीमुळे केकेआर पराभूत

विजयासाठी आक्रमक सुरुवातीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 02:19 AM2020-09-25T02:19:34+5:302020-09-25T02:19:53+5:30

whatsapp join usJoin us
KKR defeated due to wrong strategy | चुकीच्या रणनीतीमुळे केकेआर पराभूत

चुकीच्या रणनीतीमुळे केकेआर पराभूत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई इंडियन्सविरुद्ध केकेआर संघाच्या पराभवासाठी त्यांची चुकीची रणनीती कारणीभूत असल्याचे मत भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले. केकेआरला आयपीएलच्या १३ व्या पर्वात पहिल्या लढतीत मुंबई इंडियन्सविरुद्ध ४९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.


सुनील गावस्कर यांनी कर्णधार दिनेश कार्तिक व प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलमसह संघाच्या थिंक टँकवर टीका करताना म्हटले की, ज्यावेळी एखादा संघ २०० च्या जवळपास धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करीत असतो त्यावेळी सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा स्वीकारणे आवश्यक असते.’ गावस्कर पुढे म्हणाले, ‘सुनील नारायण व शुभमन गिल स्वस्तात माघारी परतल्यानंतर फलंदाजी क्रमामध्ये आंद्रे रसेल आणि इयोन मोर्गन यांच्यासारख्या दिग्गज फलंदाजांना बढती द्यायला हवी होती. नितीश राणा आणि स्वत: कर्णधार दिनेश कार्तिकला सुरुवातीला फलंदाजीला येण्याचा निर्णय चुकीचा होता.
सुनील गावस्कर यांच्या मते, रसेल व मोर्गन यांना उशिरा फलंदाजीला पाठविण्यात आल्यामुळे त्यांना आक्रमक पवित्रा स्वीकारता आला नाही. त्याचसोबत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी अचूक मारा करीत या दोघांना नैसर्गिक खेळ करण्याची संधी दिली नाही.


एका संघाविरुद्ध सर्वाधिक विजय
२०- मुंबई विरुद्ध केकेआर
१७ - केकेआर विरुद्ध पंजाब
१८ - मुंबई विरुद्ध चेन्नई
१६- मुंबई विरुद्ध बँगलोर
१५ चेन्नई विरुद्ध दिल्ली
१५- चेन्नई विरुद्ध बँगलोर

हिट विकेट हार्दिक सोशल मीडियावर ट्रोल
केकेआरविरुद्ध खेळण्यासाठी उतरलेल्या हार्दिक पांड्याकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. तो वेगवान गोलंदाज आंद्रे रसेलविरुद्ध फटका मारण्याच्या प्रयत्नात हिट विकेट झाला. हार्दिकला आपल्या खेळीत केवळ १८ धावा करता आल्या. हार्दिक हिट विकेट झाल्याबरोबर तो सोशल मीडियावर ट्रोल झाला.

Web Title: KKR defeated due to wrong strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.