IPL 2024, KKR vs RCB : कोलकाता नाईट रायडर्सने रविवारी घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर १ धावेने रोमहर्षक विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर फिल सॉल्टने डाईव्ह घेत RCB च्या शेवटच्या फलंदाजाला रन आऊट केले आणि विजय निश्चित केला. २२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरूने २२१ धावांपर्यंत मजल मारली. हा सामना विराट कोहलीच्या विकेटवरून गाजला... हर्षित राणाच्या स्लोव्हर फुलटॉसवर विराट झेलबाद झाला, परंतु विराटच्या मते तो नो बॉल द्यायला हवा होता. त्यावरून किंग कोहलीने राडाही घातला. पण, नियमानुसार विराट बाद राहिला. विराटचं हे वागणं समजू शकत होतो, परंतु KKR चा मेंटॉस गौतम गंभीर ( Gautam Gambhir) याला काय झालं? त्यानेही डग आऊटमध्ये अम्पायरसोबत राडा घातला.
''तुझ्यामुळे माझी नंतर हालत होते...'' रिंकू सिंगवर भडकला विराट कोहली, Video Viral
सामन्याच्या १९व्या षटकात जेव्हा RCB ला विजयासाठी १२ चेंडूंत ३१ धावांची गरज होती. तेव्हा KKR चा कर्णधार श्रेयस अय्यर हा डग आऊटमध्ये बसलेल्या गौतम गंभीरसोबत इशाऱ्याने काहीतरी बोलताना दिसला. त्यानंतर काहीवेळातच गौतम गंभीर आणि कोच चंद्रकांत पंडित हे चौथ्या अम्पायरसोबत हुज्जत घालताना दिसले.
सामन्यानंतर नेमकं प्रकरण समजलं.. KKR ला सुनील नरीनच्या जागी रहमनुल्लाह गुरबाज याला क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर पाठवायचे होते. नरीनच्या पायाला दुखापत झाली होती आणि तो शेवटची दोन षटकं क्षेत्ररत्रक्षण करू शकत नव्हता. पण, अम्पायरने KKR ची मागणी फेटाळली आणि त्यामुळे गंभीर खवळला. केकेआरच्या डावाच्या दुसऱ्याच षटकात आरसीबीचा वेगवान गोलंदाज यश दयालने टाकलेला चेंडू नरीच्या बोटावर आदळला होता. कोलकाताचा पुढचा सामना शुक्रवारी पंजाब किंग्सविरुद्ध होणार आहे, तर गुरुवारी बंगळुरू सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळतील.