नवा गडी, नवं राज्य... दिल्ली विजयाच्या मार्गावर परतली, कोलकात्यावर 55 धावांनी मातनवी दिल्ली : कर्णधार बदलल्यावर संघाचं नशिबही बदलत, असं म्हटलं जातं, याचाच प्रत्यय शुक्रवारी झालेल्या सामन्यात आला. दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कर्णधारपद गौतम गंभीरकडून श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले आणि पराभवाच्या दुष्काळात सापडलेला दिल्लीचा संघ विजयाच्या मार्गावर परतला. श्रेयस आणि पृथ्वी शॉ यांच्या दमदार खेळीच्या जोरावर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 219 धावा केल्या. श्रेयसने फक्त 40 चेंडूंत 3 चौकार आणि दहा षटकारांच्या जोरावर नाबाद 93 धावांची तुफानी खेळी साकारली. पृथ्वीने दमदार सलामी देताना 44 चेंडूंत 7 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 62 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचा 164 धावांवर संपुष्टात आला. दिल्लीकडून अमित मिश्रा, अव्हेश खान, ट्रेंट बोल्ट आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. या विजयासह दिल्लीने गुणतालिकेत सातवे स्थान पटकावले आहे.
11.29 PM : दिल्लीचा कोलकात्यावर 55 धावांनी विजय
11.20 PM : कोलकात्याला मोठा धक्का; आंद्रे रसेल त्रिफळाचीत
- अव्हेश खानने अठराव्या षटकात आंद्रे रसेलला बाद करत कोलकात्याला मोठा धक्का दिला. रसेलने 3 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 44 धावा फटकावल्या.
11.12 PM : शिवम मावी बाद, कोलकात्याला सातवा धक्का
- अमित मिश्राने सोळाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर शिवमला त्रिफळाचीत करत कोलकात्याला सातवा धक्का दिला.
10.56 PM : शुभमन गिल बाद, कोलकात्याला सहावा धक्का
- शुभमन गिलने 16व्या षटकात धावचीत होत आत्मघात केला. कोलकात्यासाठी हा सहावा धक्का होता.
10.45 PM : आंद्रे रसेलच्या षटकाराने कोलकात्याचे शतक पूर्ण
10.35 PM : कोलकात्याला पाचवा धक्का, दिनेश कार्तिक बाद
- दहाव्या षटकात अमित मिश्राने कार्तिकला बाद केले, कोलकात्यासाठी हा पाचवा धक्का होता.
10.21 PM : शुभम गिलच्या चौकाराने कोलकात्याचे अर्धशतक पूर्ण
10.12 PM : नितीश राणा बाद, कोलकात्याला चौथा धक्का
- सहाव्या षटकात अव्हेश खानने आपल्याच गोलंदाजीवर नितीशचा झेल घेत कोलकात्याला चौथा धक्का दिला.
10.06 PM : कोलकात्याला तिसरा धक्का, सुनील नरीन बाद
- ट्रेंट बोल्टने तिसऱ्याच षटकात उथप्पानंतर नरिनला बाद केले. नरिनने फक्त 9 चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 26 धावा फटकावल्या.
10.00 PM : कोलकात्याला दुसरा धक्का, उथप्पा बाद
- ट्रेंट बोल्टने तिसऱ्या षटकात रॉबिन उथप्पाला बाद करत कोलकात्याला दुसरा धक्का दिला.
9.55 PM : ख्रिस लिन बाद, कोलकात्याला पहिला धक्का
- ग्लेन मॅक्सवेलने दुसऱ्याच षटकात ख्रिस लिनला त्रिफळाचीत केले, कोलकात्यासाठी हा पहिला धक्का होता.
मुंबईच्या श्रेयस, पृथ्वी यांनी दिल्ली जिंकली, कोलकात्यापुढे 220 धावांचे आव्हान
नवी दिल्ली : नवनिर्वाचित कर्णधार श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ या मुंबईच्या फलंदाजांनी शुक्रवारी दिल्ली जिंकली. दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कर्णधारपद स्वीकारल्यावर पहिल्याच सामन्यात श्रेयसची बॅट चांगलीच तळपली. या सामन्यात त्याने फक्त 40 चेंडूंत 3 चौकार आणि दहा षटकारांच्या जोरावर नाबाद 93 धावांची तुफानी खेळी साकारली. पृथ्वीने दमदार सलामी देताना 44 चेंडूंत 7 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 62 धावा केल्या. या दोघांच्या तडफदार फलंदाजीमुळे दिल्लीने कोलकात्यापुढे 220 धावांचे आव्हान ठेवले.
9.35 PM : दिल्लीचे कोलकात्यापुढे 220 धावांचे आव्हान
9.32 PM : दिल्लीला चौथा धक्का, ग्लेन मॅक्सवेल बाद
9.30 PM : श्रेयस अय्यरच्या षटकारासह दिल्लीच्या दोनशे धावा पूर्ण
9.16 PM : कर्णधारपद स्वीकारल्यावर श्रेयस अय्यरची अर्धशतकी खेळी
- कर्णधारपद स्वीकारल्यावर श्रेयसने आपल्या पहिल्याच समन्यात अर्धशतकी खेळी साकारली. सतराव्या षटकात षटकार लगावत श्रेयसने आपले अर्धशतक पूर्ण केले.
9.08 PM : दिल्ली 15 षटकांत 3 बाद 140
9.05 PM : दिल्लीला तिसरा धक्का; रीषभ पंत शून्यावर बाद
- कोलकाताच्या आंद्रे रसेलने रीषभ पंतला पहिल्याच चेंडूवर बाद केले, रीषभला यावेळी भोपळाही फोडता आला नाही.
9.01 PM : पृथ्वी शॉ बाद; दिल्लीला दुसरा धक्का
- कोलकाताच्या पीयुष चावलाने पृथ्वीला त्रिफळाचीत करत दिल्लीला मोठा धक्का दिला. पृथ्वीने 44 चेंडूंत 7 चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 62 धावा केल्या.
8.53 PM : कर्णधार श्रेयस अय्यरच्या षटकारासह दिल्लीचे शतक पूर्ण
8.49 PM : पृथ्वी शॉ याचे 38 चेंडूंत अर्धशतक
- पृथ्वीने आपल्या दुसऱ्या सामन्यात सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर आयपीएलमधील पहिले शतक लगावले.
8.45 PM : दिल्ली दहा षटकांत 1 बाद 85
8.38 PM : मिचेल जाॅन्सनला पृथ्वीचे षटकाराने उत्तर
- कोलकाताचा अनुभवी गोलंदाज मिचेल जॉन्सनला पृथ्वीने दमदार षटकार लगावत चोख प्रत्यूत्तर दिले.
8.28 PM : दिल्लीला पहिला धक्का; कॉलिन मुर्नो बाद
- शिवम मावीने सातव्या षटकात कॉलिन मुर्नोला त्रिफळाचीत करत दिल्लीला पहिला धक्का दिला. कॉलिनने 18 चेंडूत चार चौैकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 33 धावा केल्या.
8.17 PM : दिल्लीचे पाचव्या षटकात अर्धशतक पूर्ण
8.10 PM : दिल्लीची तिसऱ्या षटकात चार चौकारांसह 18 धावांची लूट
- पीयुष चावलाच्या तिसऱ्या षटकात पृथ्वी शॉ आणि कॉलिन मुर्नो यांनी चार चौकारांसह 18 धावा लूटल्या.
8.06 PM : कॉलिन मुर्नोचा दिल्लीसाठी पहिला षटकार
- कुलदीप यादवच्या दुसऱ्या षटकात कॉलिनने दमदार षटकार खेचला. संघाचा हा पहिलाच षटकार होता.
7.35 PM : कर्णधारपद सोडल्यावर गौतम गंभीरला दिल्लीच्या संघातून डच्चू
7.30 PM : कोलकाताचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय
दिल्ली विजयाच्या मार्गावर परतणार का; आज कोलकात्याबरबोर सामना
नवी दिल्ली : गौतम गंभीरने दिल्ली डेअरडेव्हिल्सचे कर्णधारपद सोडल्यावर श्रेयस अय्यरकडे संघाची कमान सोपवली आहे. त्यामुळे कर्णधार बदलल्यावर संघाचे नशिब बदलणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल. शुक्रवारी दिल्लीचा सामना कोलकाता नाईट रायडर्सबरोबर होणार आहे. या सामन्यात पराभवाचा दुष्काळ दिल्ली संपवणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल. गेल्या सहा सामन्यांतील पाच पराभवांमुळे दिल्लीचा संघ गुणतालिकेत तळाला आहे. या सामन्यातील विजयाने त्यांची एका स्थानाने बढती होऊ शकते आणि स्पर्धेतील आव्हान कायम राहू शकते. दुसरीकडे कोलकात्याचा संघ चौथ्या स्थानावर असून या विजयानंतर त्यांना आपले स्थान कायम राखता येणार आहे.
दोन्ही संघ