KKR vs DD, IPL 2018 LIVE : कोलकात्याचा दिल्लीवर 71 धावांनी सहज विजय

कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना 9 फलंदाजांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव 129 धावांत संपुष्टात आला आणि कोलकात्याने 71 धावांनी सहज विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 07:52 PM2018-04-16T19:52:40+5:302018-04-16T23:28:00+5:30

whatsapp join usJoin us
KKR vs DD, IPL 2018 LIVE: Delhi won the toss and elected to bowl first | KKR vs DD, IPL 2018 LIVE : कोलकात्याचा दिल्लीवर 71 धावांनी सहज विजय

KKR vs DD, IPL 2018 LIVE : कोलकात्याचा दिल्लीवर 71 धावांनी सहज विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोलकाता : आपल्या घरच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सने सहजपणे दिल्ली डेअरडेव्हिल्सला नमवले. नितीश राणाचे अर्धशतक आणि आंद्रे रसेलच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना 9 फलंदाजांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव 129 धावांत संपुष्टात आला आणि कोलकात्याने 71 धावांनी सहज विजय मिळवला.

कोलकात्याच्या 201 धावांचा पाठलाग करताना दिल्लीली सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी 24 धावांत पहिल्या तीन फलंदाजांना गमावले. त्यानंतर रीषभ पंत आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी फटकेबाजी करत चौथ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी रचली. पण हे दोघे बाद झाल्यावर मात्र दिल्लीच्या संघाने शरणागती पत्करली. पंतने 26 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 43 धावा केल्या. मॅक्सवेलने दमदार फटकेबाजी केली खरी, पण त्याचे अर्धशतक तीन धावांनी हुकले. मॅक्सवेलने 22 चेंडूंत 3 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 47 धावा केल्या.

त्यापूर्वी, दिल्लीने नाणेफेक जिंकत कोलकात्याला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दिल्लीच्या ट्रेंट बोल्टने पहिले षटक निर्धाव टाकले. त्यानंतरच्या तिसऱ्या षटकात त्याने सुनील नरिनला एका धावेवर बाद करत कोलत्याला पहिला धक्का दिली. त्यानंतर ख्रिस लिन आणि रॉबिन उथप्पा यांनी धमाकेदार फलंदाजी करत दुसऱ्या विकटेसाठी 55 धावांची भागीदारी रचली. उथप्पा बाद झाल्यावर राणा फलंदाजीला आला आणि त्याने संघाची धावगती वाढवण्यावर बर दिला. राणा आणि रसेल या जोडीने तर दिल्लीच्या तोंडचे पाणी पळवले होते. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी रचत संघाच्या धावगतीला वेग मिळवून दिला. ट्रेंट बोल्टने रसेला बाद करत कोलकात्याला मोठा धक्का दिला. रसेलने 12 चेंडूंत सहा षटकारांच्या जोरावर 41 धावा केल्या. रसेल बाद झाल्यावही राणाने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. राणाने 30 चेंडूंत 3 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर त्याला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. राणाने 35 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 59 धावा केल्या. ख्रिस मॉरीसने अर्धशतकवीर राणाला कर्णधार गौतम गंभीरकरवी झेलबाद केले. राहुल टेवाटियाने अखेरच्या षटकात फक्त एक धाव देत तीन फलंदाजांना बाद केले.

11.18 PM : कोलकात्याची दिल्लीवर 71 धावांनी मात

11.07 PM : दिल्लीला आठवा धक्का; विजय शंकर बाद

11.05 : ख्रिस मॉरीस OUT; दिल्लीला सातवा धक्का

11.02 PM : दिल्लीला हादरा; ग्लेन मॅक्सवेल OUT

- मॅक्सवेलने अकराव्या षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर दोन षटकार लगावले. पण पाचव्या चेंडूवरही मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. मॅक्सवेलने 22 चेंडूंत 3 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 47 धावा केल्या.

10.56 PM : दिल्ली 10 षटकांत 5 बाद 99

10.54 PM : दिल्लीला पाचवा धक्का; राहुल टेवाटिया बाद

- टॉम कुरनने राहुलला आंद्रे रसेलकरवी झेलबाद केले आणि दिल्लीला पाचवा धक्का दिला.

10.45 PM : दिल्लीला चौथा धक्का; रिषभ पंत OUT

- कुलदीप यादवला मोठा फटका मारण्याच्या नादात पंत बाद झाला. पंतने 26 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 43 धावा केल्या.

10.30 PM : दिल्ली पाच षटकांत 3 बाद 45

10.20 PM : गौतम गंभीर OUT; दिल्लीला तिसरा धक्का

- कोलकात्याचा युवार गोलंदाज शिवम मावीने गंभीरला बाद करत दिल्लीला मोठा धक्का दिला.

10.08 PM : दिल्लीला दुसरा धक्का; श्रेयस अय्यर OUT

- आंद्रे रसेलने दुसऱ्या षटकात दिल्लीचा सलामीवीर श्रेयस अय्यरला बाद केले. श्रेयसने चार धावा केल्या.

10.05 PM : गौतम गंभीरचा संघासाठी पहिला चौकार

- दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरने आंद्रे रसेलच्या दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला. दिल्लीचा हा पहिला चौकार होता.

10.00 PM : दिल्लीला पहिल्याच षटकात धक्का; जेसन रॉय OUT

- कोलकात्याचा फिरकीपटू पीयुष चावलाने पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रॉयला यष्टीचीत केले.

कोलकाता : आपल्या घरच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्सच्या नितीश राणाने अर्धशतक झळकावत चाहत्यांची मने जिंकली. राणाचे अर्धशतक आणि आंद्रे रसेलच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर कोलकात्याने प्रथम फलंदाजी करताना 9 फलंदाजांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या.


दिल्लीने नाणेफेक जिंकत कोलकात्याला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. दिल्लीच्या ट्रेंट बोल्टने पहिले षटक निर्धाव टाकले. त्यानंतरच्या तिसऱ्या षटकात त्याने सुनील नरिनला एका धावेवर बाद करत कोलत्याला पहिला धक्का दिली. त्यानंतर ख्रिस लिन आणि रॉबिन उथप्पा यांनी धमाकेदार फलंदाजी करत दुसऱ्या विकटेसाठी 55 धावांची भागीदारी रचली. उथप्पा बाद झाल्यावर राणा फलंदाजीला आला आणि त्याने संघाची धावगती वाढवण्यावर बर दिला. राणा आणि रसेल या जोडीने तर दिल्लीच्या तोंडचे पाणी पळवले होते. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी रचत संघाच्या धावगतीला वेग मिळवून दिला. ट्रेंट बोल्टने रसेला बाद करत कोलकात्याला मोठा धक्का दिला. रसेलने 12 चेंडूंत सहा षटकारांच्या जोरावर 41 धावा केल्या. रसेल बाद झाल्यावही राणाने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. राणाने 30 चेंडूंत 3 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर त्याला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. राणाने 35 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 59 धावा केल्या. ख्रिस मॉरीसने अर्धशतकवीर राणाला कर्णधार गौतम गंभीरकरवी झेलबाद केले. राहुल टेवाटियाने अखेरच्या षटकात फक्त एक धाव देत तीन फलंदाजांना बाद केले.

9.45 PM : कोलकात्याचे दिल्लीपुढे 201 धावांचे आव्हान

9.39 PM : कोलकात्याच्या दोनशे धावा पूर्ण

- अखेरच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर टॉम कुरनने एकेरी धावत घेत संघाच्या दोनशे धावा फलकावर लावल्या.

9.36 PM : कोलकात्याला सहावा धक्का; अर्धशतकवीर राणा OUT

- ख्रिस मॉरीसने अर्धशतकवीर राणाला कर्णधार गौतम गंभीरकरवी झेलबाद केले. राणाने संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्यात मोलाचा वाटा उचलला. राणाने 35 चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 59 धावा केल्या.

9.28 PM : रसेलचे वादळ संपुष्टात

- ट्रेंट बोल्टने रसेला बाद करत कोलकात्याला मोठा धक्का दिला. रसेलने 12 चेंडूंत सहा षटकारांच्या जोरावर 41 धावा केल्या.

9.27 PM : नितिष राणाचे अर्धाशतक

- राणाने 30 चेंडूंत 3 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर अर्धशतक पूर्ण केले.

9.25 PM : रसेलचा झंझावात... 11 चेंडूंत 41 धावा

- इडन गार्डन्सवर रसेचा झंझावात पाहायला मिळाला. रसेलने 11 चेंडूत सहा षटकार ठोकले.

9.15 PM : राणाच्या षटकारासह कोलकात्याच्या दीडशे धावा पूर्ण

9.13 PM : रसेलकडून तीन षटकारांसह 22 धावांची लूट

9.12 PM : कोलकाता 15 षटकांत 4 बाद 145

9.11 PM : कोलकात्याच्या आंद्रे रसेलला जीवदान

9.03 PM : कोलकात्याला चौथा धक्का; दिनेश कार्तिक बाद

- कार्तिकने षकारासह दमदार सुरुवात केली होती, पण दिल्लीच्या ख्रिस मॉरिसने त्याला बाद केले. कार्तिकने 10 चेंडूंत 19 धावा केल्या.

8.54 PM : दिनेश कार्तिकने उघडले षटकाराने खाते

- कोलकात्याचा कर्णधार दिनेश कार्तिकने आपल्या दुसऱ्याच चेंडूवर षटकार ठोकला आणि दिमाखात आपले खाते उघडले.

8.48 PM : कोलकात्याला तिसरा धक्का; ख्रिस लिन OUT

- दिल्लीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या पहिल्याच षटकात संघाला यश मिळवून दिले. शमीने स्थिरस्थावर झालेल्या ख्रिस लिनला 31 धावांवर बाद केले.

8.42 PM : कोलकाता 10 षटकांत 2 बाद 85

- उथप्पा बाद झाल्यावर राणा आणि लिन यांनी संघाचा धावफलक हलता ठेवला. या दोघांच्या फटकेबाजीमुळे संघाला 10 षटकांमध्ये 85 धावा करता आल्या.

8.40 PM : नितीष राणाची धडाकेबाज फलंदाजी; षटकारानंतर चौकाराची वसूली

- राणाने नदीमच्या दहाव्या षटकामध्ये दमदार फलंदाजी केली. या षटकात त्याने प्रत्येकी एक चौकार आणि षटकार लगावत 14 धावांची वसूली केली.

8.30 PM : उथप्पा OUT; कोलकात्याला दुसरा धक्का

- नदीमने आठव्या षटकात जोरदार फटकेबाजी करणाऱ्या उथप्पाला बाद केले. उथप्पाने 19 चेंडूंत 2 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 35 धावा केल्या.

8.25 PM : रॉबिन उथप्पाची स्फोटक फलंदाजी, सहाव्या षटकात दोन षटकार

- दिल्लीचा फिरकीपटू शाहबाझ नदीमच्या सहाव्या षटकात उथप्पाने दोन षटकार आणि एका चौकाराच्या जोरावर 18 धावांची वसूली केली.

8.21 PM : कोलकाता पाच षटकांत 1 बाद 32

ख्रिस लिन आणि रॉबिन उथप्पा यांनी संयतपणे फलंदाजी करत पाच षटकांत संघाला 32 धावांपर्यंत मजल मारून दिली.

8.11 PM : OUT... कोलकात्याला पहिला धक्का; सुनील नरिन बाद

- ट्रेंट बोल्टने आपल्या दुसऱ्याच षटकात कोलकात्याचा धडाकेबा सलामीवीर सुनील नरिनला बाद केले. नरिरनला फक्त एक धावच करता आली.

8.06 PM :  ख्रिस लिनचा कोलकात्यासाठी पहिला षटकार

- पहिल्याच षटकात एकही धाव न काढणाऱ्या कोलकात्याच्या ख्रिस लिनने षटकाराने आपले खाते उघडले.

8.02 PM : कोलकात्याची दमदार सुरुवात; ट्रेंट बोल्टची पहिली ओव्हर मेडन

- कोलकात्याचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पहिल्या षटकात एकही धाव न देता संघासाठी चांगली सुरुवात केली.

7.35 PM : दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय

 

इडन गार्डन्सवर सोमवारी कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. आतापर्यंतच्या स्पर्धेत या दोन्ही संघाने प्रत्येकी तीन सामने खेळले आहेत आणि त्यांना एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. या दोन्ही संघांचे समान दोन गुण आहेत. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल चार स्थानांवर पोहोचण्याची या दोन्ही संघांना संधी असेल.

दोन्ही संघ

कोलकाता नाईट रायडर्स : दिनेश कार्तिक (कर्णधार), आंद्रे रसेल, सुनील नरिन, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, अपूर्व वानखेडे, इशांक जग्गी, नितीश राणा, रिंकू सिंह, शुभमन गिल, कॅमेरॉन डेलपोर्ट, शिवम मावी, टॉम कुरन, जॅवोन सीरल्स, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, मिशेल जॉन्सन, पीयूष चावला, विनय कुमार, कुलदीप यादव.
 

दिल्ली डेअरडेव्हिल्स : गौतम गंभीर (कर्णधार), श्रेयस अय्यर, ख्रिस मॉरीस, रिषभ पंत, ग्लेन मॅक्सवेल, जेसन रॉय, कॉलिन मुन्रो, मोहम्मद शामी, कागिसो रबाडा, अमित मिश्रा, पृथ्वी शॉ, राहुल टेवाटिया, विजय शंकर, हर्षल पटेल, अव्हेश खान, शाहबाझ नदीम, डॅनियल ख्रिस्टीयन, जयंत यादव, गुरकिरत सिंग मान, ट्रेंट बोल्ट, मनज्योत कालरा अभिषेक शर्मा, संदीप एल. नमन ओझा, सयन घोष.

 

दोन्ही संघांचे इडन गार्डन्सवर आगमन, पाहा व्हीडीओ...



 

 

Web Title: KKR vs DD, IPL 2018 LIVE: Delhi won the toss and elected to bowl first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.