Indian Premier League ( IPL 2020) मध्ये कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यातल्या सामन्यात दिनेश कार्तिकच्या जलद अर्धशतकानं रंगत वाढवली. KKRने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्सवर ( CSK) अनपेक्षित विजयानंतर KKR आत्मविश्वासानं खेळतील असे वाटले होते. पण, KXIPच्या गोलंदाजांनी त्यांच्या धावांवर सुरुवातीला लगाम लावला. मात्र, खेळपट्टीवर तग धरून बसलेल्या शुबमन गिल ( Shubman Gill) आणि कर्णधार दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik ) यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. KKR vs KXIP Latest and Live News
CSKविरुद्धच्या विजयातील नायक राहुल त्रिपाठीचा तिसऱ्याच षटकात मोहम्मद शमीनं त्रिफळा उडवला. पुढच्याच षटकात नितिश राणा आणि शुबमन गिल यांच्यातील सावळा गोंधळ पाहायला मिळाला. गिलनं शॉर्ट फाईन लेगला चेंडू टोलावला आणि नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या राणानं क्रिज सोडलं. पण, गिलचं त्याकडे लक्षच नव्हते आणि दोन्ही फलंदाज एकाच एंडला उभे राहिले. निकोलस पूरननं राणाला धावबाद करून माघारी पाठवले. झटपट दोन फलंदाज माघारी गेल्यामुळे KKRने इयॉन मॉर्गनला पुढे पाठवले. मॉर्गन आणि गिल यांनी KKRचा डाव सावरला. KKR vs KXIP Latest and Live News
कोलकाताच्या फलंदाजांचा सावळा गोंधळ; दोघंही एकाच एंडला अऩ... Video
त्यांची 49 धावांची भागीदारी रवी बिश्नोईनं संपुष्टात आणली. 11 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बिश्नोईच्या गोलंदाजीवर मॉर्गननं जोरदार फटका मारला आणि ग्लेन मॅक्सवेलनं तो सहज टिपला. मॉर्गन 24 धावांत माघारी परतला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलनं भारी सेलिब्रेशन केलं. गिल एका बाजूनं KKRचा डाव सांभाळून होत आणि त्यानं वैयक्तिक अर्धशतकी खेळीही केली. कर्णधार दिनेश कार्तिकनं त्याला साथ देताना चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागादीर केली. कार्तिकनं 22 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. गिल-कार्तिकची 82 धावांची भागीदारी 18व्या षटकात संपुष्टात आली. गिल 57 धावांवर धावबाद झाला. आंद्रे रसेल ( 5) तीन चेंडूंसाठीचा पाहुणा म्हणून आला. कार्तिकनं 29 चेंडूंत 58 धावा केल्या. कोलकाताला 6 बाद 164 धावांवर समाधान मानावे लागले.