Indian Premier League ( IPL 2020) मध्ये कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यातल्या सामन्यात दिनेश कार्तिकच्या जलद अर्धशतकानं रंगत वाढवली. KKRने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुबमन गिल ( Shubman Gill) आणि कर्णधार कार्तिक ( Dinesh Karthik ) यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. KXIPला रोखण्यासाठी मैदानावर उतरलेल्या KKRला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला. आंद्रे रसेलच्या ( Andre Russell) हातून लोकेश राहुलचा सोपा झेल सुटला. त्यानंतर चौकारही त्याला अडवता आला नाही आणि या प्रयत्नात त्यानं स्वतःला दुखापतग्रस्त करून घेतलं. KKR vs KXIP Latest and Live News
CSKविरुद्धच्या विजयातील नायक राहुल त्रिपाठीचा तिसऱ्याच षटकात मोहम्मद शमीनं त्रिफळा उडवला. पुढच्याच षटकात नितिश राणा आणि शुबमन गिल यांच्यातील सावळा गोंधळ पाहायला मिळाला. गिलनं शॉर्ट फाईन लेगला चेंडू टोलावला आणि नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या राणानं क्रिज सोडलं. पण, गिलचं त्याकडे लक्षच नव्हते आणि दोन्ही फलंदाज एकाच एंडला उभे राहिले. निकोलस पूरननं राणाला धावबाद करून माघारी पाठवले. झटपट दोन फलंदाज माघारी गेल्यामुळे KKRने इयॉन मॉर्गनला पुढे पाठवले. मॉर्गन आणि गिल यांनी KKRचा डाव सावरला. KKR vs KXIP Latest and Live News
त्यांची 49 धावांची भागीदारी रवी बिश्नोईनं संपुष्टात आणली. मॉर्गन 24 धावांत माघारी परतला. गिल एका बाजूनं KKRचा डाव सांभाळून होता आणि कार्तिकनं त्याला साथ देताना चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागादीर केली. कार्तिकनं 22 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. गिल-कार्तिकची 82 धावांची भागीदारी 18व्या षटकात संपुष्टात आली. गिल 57 धावांवर धावबाद झाला. आंद्रे रसेल ( 5) तीन चेंडूंसाठीचा पाहुणा म्हणून आला. कार्तिकनं 29 चेंडूंत 58 धावा केल्या. कोलकाताला 6 बाद 164 धावांवर समाधान मानावे लागले.
प्रत्युत्तरात उतरलेल्या KXIP ला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला असला, परंतु घडलं वेगळंच. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजावीर लोकेश राहुलचा झेल टिपण्याचा प्रयत्न करताना आंद्रे रसेलच्या हातून चेंडू सुटला. इथे लोकेशला जीवदान मिळालं, परंतु रसेलला दुखापतीमुळे मैदान सोडावं लागलं. तो गोलंदाजीसाठी येईल की नाही, याबाबतही शंका आहे. आंद्रे रसेलला IPL 2020मध्ये सहा सामन्यांत पाच विकेट्स आणि 55 धावा करता आल्या आहेत.KKR vs KXIP Latest and Live News
पाहा नेमकं काय घडलं...
Web Title: KKR vs KXIP Latest News : WATCH - Andre Russell drops catch and hurt himself while saving a boundary
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.