Join us  

IPL: जिंकलस भावा... रिंकूच्या अफलातून खेळीचं प्रतिस्पर्धी लखनौकडूनही कौतुक

लखनौ सुपर जायंट्सने या विजयासह इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या प्ले ऑफमध्ये जागा पक्की केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2023 9:06 AM

Open in App

तुमचा डाव असा हवा की, प्रतिस्पर्ध्यालाही त्याचं कौतुक व्हावं. कोलकाता नाईट रायडर्सं विरुद्द लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामना अत्यंत चुरशीचा झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार ठरलेल्या या रोमहर्षक सामन्यात लखनौने १ धावाने सामना जिंकला. मात्र, या सामन्यातील रिंकू सिंहच्या खेळीने सर्वांची मने जिंकली. विशेष म्हणजे लखनौ सुपर जायंटच्या खेळाडूंचीही मने रिंकूने जिंकली. म्हणूनच, सामन्यानंतर कर्णधार कृणाल पांड्यासह सर्वांनीच रिंकूची पाठ थोटपट त्याचे अभिनंदन केले. पराभवानंतरही अभिनंदनाचा वर्षावर रिंकू सिंहवर होत आहे. सोशल मीडियावरही रिंकू सध्या ट्रेंड करतोय. 

लखनौ सुपर जायंट्सने या विजयासह इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या प्ले ऑफमध्ये जागा पक्की केली. कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धची ही मॅच जिंकून LSG ला प्ले ऑफमधील स्थान निश्चित करायचे होते आणि त्यांनी ते केले. रिंकू सिंगने पुन्हा एकदा KKRसाठी संकटमोचकाची भूमिका बजावलीच. पण, १ धावांनी KKRला हार मानावी लागली. रिंकून ३३ चेंडूत अफलातून खेळी करत ६७ धावा केल्या, तो अखेरपर्यंत मैदानावर टिकून राहिला. रिंकू मैदानात होता, तोपर्यंत लखनौ सुपर जायंट्सच्या सर्वच खेळाडूंवर मोठं दडपण दिसून आलं. दरम्यान, विजयानंतर लखनौच्या संघाने रिंकूच्या खेळीचं कौतुक करत त्याचं अभिनंदनही केलं. तर, कोलकाता नाईट रायडर्सने सामन्यादरम्यानचा हाच फोटो ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, दुनिया रिंकू सिंह की कायल है... म्हणजेच रिंकू सिंगचा जगभरात दबदबा आहे, असे KKR ने म्हटलं आहे. 

दरम्यान, लखनौच्या १७७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या केकेआरला १२ चेंडूंत ४१ धावा KKR हव्या होत्या. रिंकूने १९व्या षटकात ४,४,४,२,६,० अशी फटकेबाजी करून मॅच फिरवली. रिंकूने २८ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ६ चेंडूंत २१ धावांची गरज असताना वैभव अरोरा स्ट्राईकवर होता. अरोराने एक धाव घेत रिंकूला स्ट्राईक दिली. ३ चेंडूंत १८ धावांची गरज असताना रिंकूने षटकार खेचला. मात्र, कोलकाताला ७ बाद १७५ धावांवर समाधान मानावे लागले आणि लखनौने १ धावेने मॅच जिंकली. त्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दोन धावा न घेण्याचा निर्णय केकेआरला महागात पडला. रिंकू ३३ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावांवर नाबाद राहिला. यावेळी, रिंकूचा स्ट्राईक रेट तब्बल २००.०३ एवढा राहिला. 

कृणाल पांड्यानेही केलं कौतुक

दरम्यान, लखनौचा स्पीनर गोलंदाज रवि बिश्नोईने रिंकूच्या फलंदाजीचं कौतुक करताना म्हटले, आम्ही प्ले ऑफमध्ये पोहोचलो याचा आनंद आहे. पण, रिंकू ज्या पद्धतीने खेळत होता. प्रत्येक चेंडूला मनात भीती वाटत होती. तर, लखनौचा कर्णधार कृणाल पंड्यानेही रिंकूचे कौतुक केले. रिंकू यंदाच्या हंगामात खास ठरला आहे, रिंकूला तुम्ही हलक्यात घेऊच शकत नाही. आजही त्याने तेच दाखवून दिलं. आम्ही अत्यंत दबावाखाली खेळत होतो. त्यामुळे, मी प्रत्येक चेंडूनंतर गोलंदाजांशी संवाद साधायचो, असे कर्णधार कृणाल पांड्याने म्हटले.  

टॅग्स :कोलकाता नाईट रायडर्सआयपीएल २०२३लखनौ सुपर जायंट्सरिंकू सिंग
Open in App