Indian Premier League ( IPL 2020) च्या प्ले ऑफच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्याच्या निर्धारानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) शारजाह स्टेडियमवर उतरले आहेत. दोन्ही संघांनी ६ पैकी ४ सामने जिंकून प्रत्येकी ८ गुणांची कमाई केली आहे. नाणेफेक जिंकून RCBनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. देवदत्त पडीक्कल आणि आरोन फिंच यांनी RCBला दमदार सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी ६७ धावा जोडल्या. ८व्या षटकात आंद्रे रसेलनं ( Andre Russell) KKRला पहिले यश मिळवून दिले. त्यानं पडीक्कलचा त्रिफळा उडवला. पडीक्कल २३ चेंडूंत ३२ धावांवर माघारी परतला. रसेलनं या विकेटसह ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये नव्या विक्रमाला गवसणी घातली. असा पराक्रम करणारा तो जगातील दहावा गोलंदाज ठरला आहे. Face of IPL 2020: यूएईत ग्लॅमर मिस करताय? मग हे फोटो देतील तुम्हाला आनंद!
RCB Playing XI - देवदत्त पडीक्कल, विराट कोहली, आरोन फिंच, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, इसुरू उडाना, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.
KKR Playing XI - शुबमन गिल, टॉम बँटन, नितिश राणा, दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, प्रसिध कृष्णा, वरुण चक्रवर्थी
पाहा देवदत्त पडीक्कलची विकेट
ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स घेणारा आंद्रे रसेल हा दहावा गोलंदाज ठरला आहे. कोलकातानं उतरवला हुकमी एक्का, पाकिस्तानची धुलाई करणारा फलंदाज आज RCBवर बरसणार! ड्वेन ब्राव्हो - ५०९लसिथ मलिंगा - ३९०सुनील नरीन - ३९०इम्रान ताहीर - ३८०सोहैल तन्वीर - ३६२शकीब अल हसन - ३५४शाहिद आफ्रिदी - ३३९रशीद खान - ३१७वाहब रियाझ - ३०४आंद्रे रसेल - ३००*