मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आपल्या याआधीच्या दोन्ही सामन्यांत निर्णायक क्षणी पुनरागमन करताना गमावलेला सामना खेचून आणला. किंग्ज ईलेव्हन पंजाबला (Kings XI Punjab) असेच अखेरच्या ५ षटकांमध्ये वर्चस्व राखत केकेआरने धमाकेदार बाजी मारत विजयी मार्गावरुन वाटचाल सुरु केली. मात्र या वेळी केकेआरला दोन धक्केही बसले. पहिला धक्का म्हणज स्टार फिरकीपटू सुनील नरेन (Sunil Narain) याच्या गोलंदाजी शैलीवर आक्षेप घेण्यात आला. तसेच पंजाबविरुद्ध क्षेत्ररक्षणादरम्यान हुकमी अष्टपैलू आंद्रे रसेल (Andre Russel) दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला होता. त्यामुळे केकेआरची चिंता वाढली होती.
आता केकेआर संघ व्यवस्थापनाने एक ट्वीट करताना रसेल आरसीबीविरुद्ध खेळणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे अता आरसीबीला नक्की घाम फुटला असेल. याला कारण म्हणजे रसेलचा आरसीबीविरुद्ध असलेला जबरदस्त रेकॉर्ड. केकेआरसाठी रसेल हुकमी खेळाडू आहे. मात्र असे असले तरी अद्याप तो आपल्या लौकिकाप्रमाणे खेळ करु शकलेला नाही. त्यामुळेच आता आरसीबीविरुद्ध रसेल नक्की फॉर्ममध्ये येईल, असा विश्वास केकेआरला आहे.
आतापर्यंत झालेल्या ६ सामन्यांत रसेलने केवळ ५५ धावा काढताना ११ ची सरासरी राखली आहे. या खेळीमध्ये त्याने आतापर्यंत केवळ ४ चौकार व ४ षटकार खेचले आहेत. गोलंदाजीतही रसेलला फारसी छाप पाडता आलेली नाही. सहा सामन्यांत मिळून त्याने केवळ ५ बळी मिळवले असून २ बाद २९ धावा अशी त्याची सर्वोत्तम कामगिरी झाली आहे.
असे असले तरी आजचा आरसीबीविरुद्धचा सामना रसेलसाठी बुस्टर ठरु शकतो. रसेलचा आरसीबीविरुद्धचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्यामुळेच आता तो खेळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने आरसीबीला घाम फुटला असेल. रसेलने आरसीबीविरुद्ध आतापर्यंत २२७.४६ च्या तुफानी स्ट्राईक रेटने धावा कुटल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याने आरसीबीविरुद्ध ५३.८३ च्या जबरदस्त सरासरीने धावा फटकावल्या आहेत. त्यामुळेच आज रात्रीही स्फोटक खेळी पाहण्याची शक्यता आहे, अशी पोस्ट करत केकेआरने रसेल खेळणार असल्याचे स्पष्ट केले.
Web Title: KKR vs RCB Latest News: Andre Russell to play today; KKR's tweets; RCB broke out in a sweat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.