Indian Premier League ( IPL 2020) च्या प्ले ऑफच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकण्याच्या निर्धारानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) आणि कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) शारजाह स्टेडियमवर उतरले आहेत. दोन्ही संघांनी ६ पैकी ४ सामने जिंकून प्रत्येकी ८ गुणांची कमाई केली आहे. शाहजाह स्टेडियमवर दोन्ही संघ प्रथमच एकमेकांना भिडत आहेत, त्यामुळे चौकार-षटकारांचा पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे. त्यासाठी KKRचा कर्णधार दिनेश कार्तिक यानं हुकमी एक्का मैदानावर उतरवला आहे. त्याच्या फटकेबाजीची पाकिस्तान संघानेही धास्ती घेतली होती. आज तो विराट कोहलीच्या RCBचा समाचार घेण्यासाठी सज्ज आहे.
RCB Playing XI - देवदत्त पडीक्कल, विराट कोहली, आरोन फिंच, एबी डिव्हिलियर्स, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, इसुरू उडाना, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.
KKR Playing XI - शुबमन गिल, टॉम बँटन, नितिश राणा, दिनेश कार्तिक, इयॉन मॉर्गन, राहुल त्रिपाठी, आंद्रे रसेल, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, प्रसिध कृष्णा, वरुण चक्रवर्थी
टॉम बँटननं ४० ट्वेंटी-20त २९.५४ च्या सरासरीनं १०९३ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १ शतक व ८ अर्धशतकं आहेत. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20तही त्यानं ९ सामन्यांत २०५ धावा केल्या आहेत. पाकिस्तानविरुद्ध त्याची ७१ धावांची खेळी ही अविस्मरणीय होती.
टॉम बँटनचे IPLमध्ये पदार्पण
- समरसेट व इंग्लंड संघाचे केले प्रतिनिधित्व
- २०१८च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंड संघाचा सदस्य
- ब्रिस्बन हिटसाठी ७ सामन्यंत १७७च्या स्ट्राईक रेटनं २२३ धावा
- पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर झाल्मी संघाचा सदस्य
- पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामन्यांत ४२ चेंडूंत ७१ धावा
- कोलकाता नाईट रायडर्सनं १ कोटींत घेतलं ताफ्यात
Web Title: KKR vs RCB Latest News : Tom Banton has given Kolkata Knight Riders cap, debut in Indian Premier League 2020
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.