जयपूर : गोलंदाजांच्या नियंत्रित माऱ्यानंतर फलंदाजांच्या दमदार आक्रमकतेच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने दणदणीत विजय मिळवताना राजस्थान रॉयल्सचा ७ गड्यांनी पराभव केला. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १६० धावा उभारल्यानंतर कोलकाताने १८.५ षटकात ३ बाद १६३ धावा केल्या.सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारताना यजमान राजस्थानला मर्यादित धावसंख्येत रोखले. यानंतर धावांचा पाठलाग करताना कोलकाताची अडखळती सुउरुवात झाली. पहिल्याच षटकात ख्रिस लीनच्या (०) रुपाने धक्का बसल्यानंतर सुनील नरेन (३५) आणि रॉबिन उथप्पा (४८) यांनी जबरदस्त फटकेबाजी करत ६९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. नवव्या षटकात नरेन धावबाद झाला. त्याने २५ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह खेळी सजवली. उथप्पा गौथमच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ३६ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांसह ४८ धावा काढल्या. यानंतर नितिश राणा (२७ चेंडूत नाबाद ३५) आणि कर्णधार दिनेश कार्तिक (२३ चेंडूत नाबाद ४२) यांनी नाबाद ६१ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कृष्णप्पा गौथम याने २३ धावांत २ बळी घेत कोलकाताला रोखण्याचा प्रयत्न केला.तत्पूर्वी, अत्यंत हळुवार सावध केलेल्या राजस्थानला कर्णधार अजिंक्य रहाणेने चांगली धावगती गाठून दिली. त्याने नरेनच्या गोलंदाजीवर हल्ला चढवत राजस्थानवरील दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला. रहाणेने १९ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ३६ धावांची खेळी केली. त्याने डी’अॅर्सीसह ५४ धावांची अर्धशतकी सलामी दिली. शॉर्टने ४३ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ४४ धावांची संथ खेळी केली. कोलकाताने ठराविक अंतराने बळी मिळवत राजस्थानला दबावाखाली ठेवले. नितिश राणा, टॉम कुर्रान यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. (वृत्तसंस्था)धावफलकराजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे यष्टीचीत कार्तिक गो. राणा ३६, डी’अॅर्सी शॉर्ट त्रि. गो. राणा ४४, संजू सॅमसन झे. कुलदीप गो. मावी ७, राहुल त्रिपाठी झे. रसेल गो. कुलदीप १५, बेन स्टोक्स झे. राणा गो. चावला १४, जोस बटलर नाबाद २४, क्रिष्णप्पा गौथम झे. मावी गो. कुर्रान १२, श्रेयश गोपाल त्रि. गो. कुर्रान ०, धवल कुलकर्णी धावबाद (गिल - मावी) ३, जयदेव उनाडकट नाबाद ०. अवांतर - ५. एकूण : २० षटकात ८ बाद १६० धावा.गोलंदाजी : पियूष चावला ४-०-१८-१; कुलदीप यादव ४-०-२३-१; सुनील नरेन ४-०-४८-०; शिवम मावी ४-०-४०-१; नितिश राणा २-०-११-२; टॉम कुर्रान २-०-१९-२.कोलकाता नाइट रायडर्स : सुनील नरेन धावबाद (उनाडकट) ३५, ख्रिस लीन त्रि. गो. गौथम ०, रॉबिन उथप्पा झे. स्टोक्स गो. गौथम ४८, नितिश राणा नाबाद ३५, दिनेश कार्तिक नाबाद ४२. अवांतर - ३. एकूण : १८.५ षटकात ३ बाद १६३ धावा.गोलंदाजी : क्रिष्णप्पा गौथम ४-०-२३-२; धवल कुलकर्णी २-०-२०-२; जयदेव उनाडकट ३-०-३४-०; बेन लॉघलिन ३.५-०-३७-०; श्रेयस गोपाल ३-०-२३-०; बेन स्टोक्स ३-०-२५-०.
KKR vs RR Updates -
23:27pm - वाह! 'राणा'दा, कोलकात्याचा राजस्थानवर विजय
11:14PM - 16 षटकानंतर कोलकाताने तीन बाद 126 धावा केल्या. विजयासाठी 24 चेंडूत 35 धावांची गरज. कर्णधार कार्तिक आणि राणा मैदानावर
10:56PM - रॉबिन उथप्पाचे अर्धशतक हुकले, कोलकात्याला तिसरा धक्का
रॉबिन उथप्पाचे अर्धशतक दोन धावांनी हुकले, स्टोक्सने 48 धावांवर उथप्पाला केले बाद. उथप्पाने 36 चेंडूत दोन षटकार आणि सहा चौकारासह 48 धावांची खेळी केली. कोलकात्याला विजयासाठी 38 चेंडूत 48 धावांची गरज आहे.
10:42PM - नरेन बाद, कोलकात्याची विजयाकडे वाटचाल
दहा षटकानंतर कोलकाताने दोन बाद 87 धावा केल्या. सुनिल नरेन 25 चेंडूत 32 धावा काढून धावबाद झाला. कोलकात्याला विजयासाठी 60 चेंडूक 74 धावांची गरज आहे. उथप्पा 30 चेंडूत 2 षटकार आणि सहा चौकारांसह 46 धावांवर खेळत आहे.
10:23PM - सहा षटकानंतर कोलताकात्याच्या एक बाद 62 धावा
सुनिल नरेन आणि रॉबिन उथ्थपाने फटकेबाजीला सुरुवात केली. पॉवरप्लेच्या पहिल्या सहा षटकांत नरेनने 30 आणि आणि उथप्पाने 32 धावा केल्या. विजयासाठी 13 षटकांत 99 धावांची गरज
10:10PM -गौतमची अचूक टप्प्यावर गोलंदाजी
कृष्णप्पा गौतमने टिच्चून मारा केला. दोन षटकात सात धावा देताना एक बळी घेतला. कृष्णप्पाने कोलकात्याच्या फंलदाचाला मोठे फटके मारण्यापासून रोखले.
10:00PM - कोलकात्याला पहिला धक्का, लिन परतला तंबूत
09:41PM - कोलकात्यासमोर विजयासाठी 161 धावांचे आव्हान
अजिंक्य रहाणे आणि शॉर्ट यांच्या फलंदाजीच्या जोरावर राजस्थान संघाने निर्धारित 20 षटकांत आठ बाद 160 धावांपर्यंत मजल मारली. रहाणेवगळता राजस्थानच्या इतर एकाही फलदांजाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. रहाणेनं 18 चेंडूत 1 षटकार आणि पाच चौकारासह 36 धावांची खेळी केली. रहाणे बाद झाल्यानंतर संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. एकाबाजून विकेट पडत असताना शॉर्ट संयमी फंलदाजी करत होता. शॉर्टने 43 चेंडूत 1 षटकार आणि पाच चौकारासह 44 धावांची खेळी केली. रहाणे-शॉर्ट शिवाय इतर फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. शेवटच्या क्षणी फटकेबाजी करत संघाची धावसंख्या 160 पर्यंत पोहचवली. बटलरने 18 चेंडूत 24 धावांची खेळी केली. सॅमसन(7), त्रिपाटी (14), स्टोक्स (15) आणि गौतम (12) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.
फंलंदाजी - रहाणे 36 धावा, शॉर्ट 44 धावा , बटलर 24 धावा
गोलंदाजी - कुलदिप यादव 4 - 0 -24 -1 , पियुष चावला 4 - 0 - 18 - 1, सुनिल नरेन 4 - 0 - 48 -0शिवम मावी 4 - 0 - 40 -1, टॉम कुरन 2 - 0 - 19 - 2, नितेश राणा 2 - 0 - 11 - 2
09:40PM - निर्धारित 20 षटकांत राजस्थानची 8 बाद 160 धावांपर्यंत मजल, कोलकात्याला विजयासाठी 161 धावांचे आव्हान
09:35PM - राजस्थानच्या 19 षटकांत सात बाद 151 धावा
09:27PM - राजस्थानला सलग दोन धक्के
टॉम कुरनने राजस्थानला सलग दोन धक्के दिले. 19 व्या षटकांतील पहिल्या चेंडूवर कृष्णप्पा गौतमला आणि दुसऱ्या चेडूंवर गोपलाला बाद केले.
09:25PM - सुनिल नरेनची गोलंदाजी राजस्थानच्या फलंदाजांनी काढली फोडून. नरेनच्या चार षटकांमध्ये 48 धावा केल्या वसूल. राजस्थानने 18 षटकांमध्ये पाच बाद 141 धावा केल्या.
09:20PM - स्टोक्स बाद
चावलाने आपल्या चौथ्या षटकांमध्ये धोकादायक स्टोक्सला बाद केले. स्टोक्सने 11 चेंडूत एका षटकारासह 14 धावांची खेळी केली. 17 षटकांनतर राजस्थानने पाच बाद 127 धावा केल्या.
09:15PM - राजस्थान संघाचे फलंदाज धावांसाठी संघर्ष करत आहेत. 16 षटकानंतर चार गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा केल्या आहेत. बटलर 5 तर स्टोक्स14 धावांवर खेळत आहे.
कोलकात्याकडून कुलदिप यादवने चार षटकांत 24 धावा देत एक बळी मिळवला आहे.
09:11PM - राजस्थानला चौथा धक्का
राहुल त्रिपाठी बाद, 11 चेंडूत केल्या 15 धावा. कुलदिप यादवने रसेल करवी केलं झेलबाद. राजस्थानच्या 14 षटकानंतर चार बाद 106 धावा.
09:05PM - राजस्थान संघाचे शतक -
14 व्या षटकांमध्ये राजस्थान संघाचे शतक फलकावर लागले. रहाणे 36 आणि शॉर्टने 44 धावांचे योगदान दिले. सॅमसन आज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. सद्या स्टोक्स आणि राहुल त्रिपाटी मैदानावर आहेत.
09:00PM - राजस्थानला तिसरा धक्का -
रहाणे बाद झाल्यानंतर शॉर्टने संयमी फटकेबाजी करत संघाची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला पण नितेश राणाने त्याला बाद करत कोलकात्याला तिसरे यश मिळवून दिले. शॉर्टने 43 चेंडूत 44 धावांची खेळी केली.
08:54PM - 11 षटकानंतर दोन बाद 81 धावा.
कोलकाताकडून फिरकी गोलंदाज सुनिल नरेन महागडा ठरला. नरेनच्या दोन षटकात राजस्थानच्या फलंदाजांनी 28 धांवा वसूल केल्या. सध्या त्रिपाटी 7 आणि शॉर्ट 31 धावांवर खेळत आहेत.
08:50PM - 10 षटकानंतर राजस्थानच्या दोन बाद 71 धावा
दहा षटकानंतर राजस्थानच्या दोन बाद 71 धावा झाल्या आहेत. अजिंक्य रहाणे 36 धावांवर बाद झाला. सध्या त्रिपाची 3 धावांवर तर डी'आर्की शॉर्ट 25 धांवावर खेळत आहेत. कोलकात्याकडून शिवम मावीने दोन षटकांमध्ये 17 धावा देत एक बळी मिळवला.
08:43PM - रहाणेनंतर संजू सॅमसनही बाद, राजस्थान अडचणीत
मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात संजू सॅमसन बाद झाला आहे. संजू ने 8 चेंडूत सात धावा केल्या. युवा गोलंदाज शिवम मावीने कुलदिप यादव करवी सॅमसनला केले बाद. राजस्थानच्या 9 षटकांनतर 2 बाद 62 धावा
08:34PM - राजस्थानला मोठा झटका, रहाणे बाद
अजिंक्य रहाणे नितेश राणाला मारण्यासाठी पुढे आला असता कार्तिकने केले यष्टिचीत. रहाणे बाद झाल्यामुळं कोलकात्याच्या संघाला मोठ यश मिळालं आहे. पहिल्या सहा षटकांमध्ये रहाणेने 17 चेंडूत 35 धांवाची वादळी खेळी केली होती. अजिंक्य रहाणे 36 धावांवर बाद झाला आहे. आठ षटकांनतर राजस्थानच्या एक बाज 58 धावा झाल्या आहेत. डी'आर्की शॉर्ट 25 चेंडूत 18 धावांवर खेळत आहे.
08:28PM - पहिल्या सहा षटकांत राजस्थानच्या 48 धावा. रहाणे17 चेंडूत 35 धावा करुन खेळत आहे. मात्र डी'आर्की शॉर्टची अतिशय संथ फलंदाजी सुरु आहे. 19 चेंडूत 12 धावांवर तो खेळत आहे.
08:25PM - डी'आर्की शॉर्टची संथ फलंदाजी, 18 चेंडूत केल्या फक्त 11 धावा
08:23PM - शिवम मावीच्या पहिल्या आणि कोलकाताच्या पाचव्या षटकांमध्ये राजस्थानने 13 धावा केल्या वसूल. पाच षटकांत राजस्थानच्या 40 धावा. रहाणे29 धावांवर खेळत आहे.
08:15PM - रहाणेची फटेबाजी, नरेला लगावले चार चौकार
चौथ्या षटकांमध्ये रहाणेने आपले हात खोलले, नरेनच्या पहिल्या चार चेंडूवर सलग चौकार खेचत संघाची धावसंख्या वाढवले. चार षटकांनतर राजस्थानने केल्या बिनबाद 27 धावा. रहाणे 12 चेंडूत 22 धावांवर खेळत आहे.
08:13PM - कोलकाताची टिच्चून गोलंदाजी, राजस्थानची संथ सुरुवात
कुलदिप यादव आणि पियुष चावलाने अचुक टप्यावर गोलंदाजी करत कोलकात्याच्या फंलदाजांना मोठे फटके मारण्यापासून रोखले. पहिल्या तीन षटकात कोलकात्याला फक्त 9 धावा करता आल्या.
08:09PM - दुसऱ्या षटकाअखेर राजस्थान संघाच्या बिनबाद 7 धावा, रहाणे 4 तर डी'आर्की शॉर्ट 2 धावांवर खेळत आहेत.
08: 07PM - दुसरे षटकही फिरकी गोलंदाजाला
सामन्याच्या पहिल्या षटकांमध्ये पियुष चावलाने कंजुस गोलंदाजी केल्यानंतर कार्तिकने दुसरे षटक फिरकी गोलंदाजाला दिले. मैदानावर पडलेल्या दवाचा फायदा गोलंदाज घेत आहेत.
08:05PM - पियुष चावलाच्या पहिल्या षटकामध्ये राजस्थानच्या फलंदाजाला फक्त 3 धावा करता आल्या.
08:00PM - राजस्थानकडून अजिंक्य रहाणे आणि डी'आर्की शॉर्ट फंलदाजीसाठी मैदानात. तर कोलकाताकडून पियुष चावला पहिले षटक घेऊन आला.
07:50PM - राजस्थान आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत 15 सामने झाले आहेत. यामध्ये राजस्थान संघाने 9 सामन्यामध्ये बाजी मारली आहे. तर सहा वेळा कोलकाता संघाने विजय मिळवला आहे.
07: 45PM : राजस्थान संघ -
07 :42PM : कोलकाता संघ -
07 :40PM - कोलकाता आणि राजस्थान संघात कोणताही बदल नाही. गेल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्याचा दोन्ही कर्णधाराचा निर्णय
07:32PM - कोलकाताने नाणेफेक जिंकली, राजस्थान करणार प्रथम फलंदाजी