कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक याला केकेआरच्या आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. तसेच त्याचे नेतृत्व देखील प्रभावी ठरलेले नाही. त्यामुळे केकेआरच्या फॅन्सनी टिष्ट्वटरवर त्याच्या विरोधात मोहीमच उघडली आहे. ‘संघात विश्वविजेता कर्णधार ईयॉन मॉर्गन असताना कार्तिकला नेतृत्व का दिले,’ असा थेट सवालच फॅन्सनी उपस्थित केला आहे.
कार्तिकने पहिल्या सामन्यात ३० धावा केल्या, हा सामना मुंबई इंडियन्सने जिंकला. त्यानंतर सनरायजर्सला केकेआरने पराभूत केले. पण कार्तिकला भोपळाही फोडता आला नाही. राजस्थान रॉयल्सविरोधातही कार्तिक फक्त एकच धाव करून बाद झाला. कार्तिकने या सत्रात आतापर्यंत तीन सामन्यात तीस धावा केल्या आहेत. तर इयॉन मॉर्गनने त्यापेक्षा कितीतरी सरस कामगिरी केली आहे. त्याच्याच नेतृत्वात गेल्या वर्षी इंग्लंडने जेतेपद पटकावले. त्यामुळे खराब कामगिरी करणाºया दिनेश कार्तिकला कर्णधारपदावरून दूर करून त्याऐवजी इयॉन मॉर्गनच्या हाती केकेआरची धुरा सोपवण्याची मागणी होत आहे.
कार्तिक बाद झाल्यानंतर हाच ट्रेंड सोशल मिडिया साईट्सवर होता. कार्तिकला यष्टींच्या मागे देखील फारशी चमकदार काम गिरी करता आलेली नाही. त्याला पहिल्या दोन्ही सामन्यात एकही झेल घेता आला नाही. गोलंदाज असलेल्या पॅट कमिन्सने तीन सामन्यात मिळून ४५ धावा केल्या आहेत. तर कार्तिकला फक्त ३१ धावा करता आल्या आहेत.