Join us

KKRvRR, IPL 2018 LIVE UPDATES : कोलकात्याचा राजस्थानवर सहा विकेट्स राखून सहज विजय

भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर सहा विकेट्स टराखून दमदार विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 23:41 IST

Open in App
ठळक मुद्देराजस्थानच्या 142 धावांचा पाठलाग करताना कोलकात्याच्या ख्रिस लिन आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांनी सुरेख फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

कोलकात्याचा राजस्थानवर सहा विकेट्स राखून सहज विजय

कोलकाता : भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सवर सहा विकेट्स टराखून दमदार विजय मिळवला. कोलकात्याच्या कुलदीप यादवने चार बळी मिळवत राजस्थानच्या डावाला खिंडार पाडले. त्यामुळे राजस्थानला 142 धावांवर समाधान मानावे लागले. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याच्या ख्रिस लिन आणि कर्णधार दिनेश कार्तिक यांनी सुरेख फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. लिनने 42 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 45 धावांची खेळी साकारली. लिन बाद झाल्यावर कार्तिकने अखेरपर्यंत किल्ला लढवला. त्याने 31 चेडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद 41 धावा केल्या आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

11.20 PM : कोलकात्याला विजयासाठी 18 चेंडूंत 14 धावांची गरज

11.08 PM : कोलकात्याला मोठा धक्का; ख्रिस लिन OUT

- बेन स्टोक्सने ख्रिस लिनला बाद करत कोलकात्याला मोठा धक्का दिला. लिनने 42 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 45 धावांची खेळी साकारली.

10.52 PM : कोलकाता 12 षटकांत 3 बाद 89

10.38 PM : नीतीश राणा बाद; कोलकात्याला तिसरा धक्का

- इश सोधीने राणाला पायचीत पकडत कोलकात्याला तिसरा धक्का दिला, राणाने 21 धावा केल्या.

10.25 PM : कोलकाता पाच षटकांत 2 बाद 46

10.13 PM : रॉबिन उथप्पा बाद; कोलकात्याला दुसरा धक्का

- बेन स्टोक्सने उथप्पाला राहुल त्रिपाठीकरवी झेल बाद केले आणि कोलकात्याला दुसरा धक्का दिला. उथप्पाला चार धावा करता आल्या.

10.01 PM :  सुनील नरिन बाद; 7 चेंडूंत 21 धावांची तुफानी खेळी

- बेन स्टोक्सने नरिनला बाद करत कोलकात्याला पहिला धक्का दिला. नरिनने सात चेंडूंत प्रत्येकी दोन चौकार आणि षटकारांच्या जोरावर 21 धावा केल्या.

9.55 PM :  कोलकात्याच्या पहिल्याच षटकात नरिनच्या 21 धावा

9.55 PM : सुनील नरिनने षटकाराने केली कोलकात्याच्या डावाची सुरुवात

दमदार सुरुवातीनंतरही राजस्थानच्या 142 धावा; कुलदीपचा 'बळी'चौकार

कोलकाता : राजस्थानला पाच षटकांत 63 धावांची सलामी मिळाली होती. त्यावेळी राजस्थानचा संघ दोनशे धावांचा टप्पा गाठेल असे वाटले होते. पण कोलकात्याच्या कुलदीप यादवने केलेल्या भेदक गोलंदाजीने राजस्थानचे कंबरडे मोडले. कुलदीपने चार षटकांत 20 धावा देत चार राजस्थानच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. कुलदीपला अन्य गोलंजांनीही चांगली साथ दिल्यामुळे राजस्थानच्या संघाला 142 धावा करता आल्या.

9.41 PM :राजस्थानचा संघ 142 धावांत तंबूत; कुलदीप यादवचे चार बळी

9.33 PM : राजस्थानला नववा धक्का; जेफ्रो आर्चर बाद

- आंद्रे रसेलने आर्चरला बाद करत राजस्थानला नववा धक्का दिला. आर्चरने सहा धावा केल्या.

9.26 PM : राजस्थानला आठवा धक्का; ईश सोधी बाद

9.18 PM : राजस्थान 15 षटकांत 7 बाद 118

9.13 PM : बेन स्टोक्स OUT; राजस्थानला सातवा धक्का

- कुलदीप यादवने स्वत:च्याच गोलंदाजीवर बेन स्टोक्सचा झेल पकडला. राजस्थानसाठी हा सातवा धक्का होता. कुलदीपने या सामन्यात 20 धावांत चार बळी मिळवले.

इडन गार्डन्सवर अवतरला प्रिन्स ऑफ कोलकाता... पाहा फोटो

 

9.08 PM : कृष्णप्पा गौतम OUT; राजस्थानला सहावा धक्का

- शिवम मावीने कृष्णप्पा गौतमला बाद करत राजस्थानला सहावा धक्का दिला. गौतमला फक्त तीन धावा करता आल्या.

8.58 PM : स्टुअर्ट बिन्नी OUT; राजस्थानचा अर्धा संघ तंबूत

- कुलदीप यादवने बिन्नीला दिनेश कार्तिककरवी यष्टीचीत करत राजस्थानला पाचवा धक्का दिला. बिन्नीला फक्त एक धाव करता आली.

8.55 PM : संजू सॅमसन OUT; राजस्थानला चौथा धक्का

- सुनील नरिनने सॅमसनला पायचीत पकडत राजस्थानला चौथा धक्का दिला. सॅमसनला 12 धावा करता आल्या.

8.45 PM : जोस बटलर OUT; राजस्थानला तिसरा धक्का

- कुलदीप यादवने फटकेबाजी करणाऱ्या बटलरला बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला. बटलरने 22 चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 39 धावा केल्या.

8.34 PM : अजिंक्य रहाणे OUT; राजस्थानला दुसरा धक्का

- कुलदीप यादवने कर्णधार अजिंक्य रहाणेला त्रिफळाचीत करत राजस्थानला दुसरा धक्का दिला. रहाणेने 11 धावा केल्या.

8.23 PM : राजस्थानला पहिला धक्का; राहुल त्रिपाठी बाद

 - आंद्रे रसेलने पाचव्या षटकात राहुल त्रिपाठीला बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला. राहुलने 15 चेंडूंत 27 धावा केल्या. त्याचबरोबर राहुल आणि बटलर यांनी 29 चेंडूंत 63 धावांची सलामी दिली.

8.16 PM :  राजस्थानने दहा चेंडूंत फटकावल्या 46 धावा

- जोस बटलरने शिवम मावीच्या तिसऱ्या षटकात तब्बल 28 धावाची लूट केली, तर दुसऱ्या षटकात राहुल त्रिपाठीने 18 धावा फटकावल्या होत्या.

8.08 PM : राहुल त्रिपाठीचा राजस्थानसाठी पहिला षटकार

- राहुल त्रिपाठीने दुसऱ्याच षटकात एक षटकार आणि तीन चौकारांसह तब्बल 19 धावा लूटल्या.

7.48 PM : प्रतिष्ठेच्या लढाईसाठी कसा केला राजस्थान आणि कोलकात्याने सराव... पाहा व्हीडीओ

 

7.40 PM : श्रेयस गोपाळ आणि धवल कुलकर्णी यांना राजस्थानने वगळले

7.30 PM : कोलकात्याने नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजीसाठी पाचारण केले

 

कोलकाता आणि राजस्थानसाठी निर्णायक सामना

कोलकाता : सध्याच्या घडीला आयपीएल एका रंजक वळणावर आहे. कारण आता बऱ्याच संघाना वेध लागले आहेत ते बाद फेरीत पोहोचण्याचे. त्यामुळे मंगळवारी होणारा हा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोघांसाठी निर्णायक असेल. सध्याच्या घडीला दोन्ही संघांचे 12 सामन्यांत 12 गुण आहेत. त्यामुळे हा सामना जो संघ जिंकेल त्यांना बाद फेरीत पोहोचण्यासाठी जास्त अडचणी येणार नाही. दोन्ही संघ चांगलेच समतोल वाटत असले तरी राजस्थानपेक्षा कोलकात्याचे पारडे जड समजले जात आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे विजयासह कोणता संघ प्रतिष्ठा जपणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

दोन्ही संघ

 

 

 

दोन्ही संघांचे इडन गार्डन्सवर आगमन... पाहा हा व्हीडीओ

 

टॅग्स :आयपीएल 2018कोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्सअजिंक्य रहाणे